दुचाकी ओव्हरटेक केल्याने तरुणावर प्राणघातक हल्ला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

पुसद (जि. यवतमाळ) : दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या वादातून 25 जणांच्या टोळक्‍याने दुचाकी अडवून एकास जबर मारहाण केल्याची घटना रविवारी (ता. 14) रात्री 12 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे वसंतनगर परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

पुसद (जि. यवतमाळ) : दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या वादातून 25 जणांच्या टोळक्‍याने दुचाकी अडवून एकास जबर मारहाण केल्याची घटना रविवारी (ता. 14) रात्री 12 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे वसंतनगर परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव प्रवीण दादाराव कदम (वय 32, रा. गांधीनगर, पुसद) असे आहे. रात्रीच्या वेळी प्रवीण हा आपल्या दुचाकीने घराकडे जात असताना त्यास वाटेत काही तरुणांनी त्याची दुचाकी अडविली व ओव्हरटेक करून जाण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. त्यात सलमान शहा शकशेर शहा याने प्रवीणच्या कपाळावर लोखंडी रॉड मारून जखमी केले. इतर साथीदार सोयब खान अख्तर खान, अयाझ ऊर्फ चाऊस, अक्‍का, अमजद हॉटेलवाला व इतरांनी लाथाबुक्‍याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात प्रवीणला नाकाला, कपाळाला व हाताला मार लागला. यावेळी पोलिस कर्मचारी अरविंद चव्हाण यांनी मी पोलिस कर्मचारी आहे, असे सांगत प्रवीणची सुटका केली व पोलिस ठाण्याला आणले. प्राप्त तक्रारीवरून वसंतनगर पोलिसांनी अनेकांवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. ठाणेदार प्रदीप परदेशी यांनी परिसरात बंदोबस्त वाढविला असून, फरार असलेल्या संशयित आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. या प्रकारापूर्वी तालुक्‍यातील वालतूरजवळील भोजला येथे जात असलेल्या नीलेश राऊत व रोशन ठाकरे यांनी जांबबाजार येथील सैरूयद अमजद अली सय्यद रहेमत अली यास मारहाण केली होती. याच घटनेतून प्रवीणला मारहाण करण्यात आल्याची चर्चा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two-wheeler overtake of attack on the young man