अमरावती जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

अमरावती : ग्रामीण भागात दुचाकीचोरांना आळा घालण्यात पोलिसांना यश आलेले नाही. दर्यापूर, शिरसगाव व परतवाडा ठाण्याच्या हद्दीतून तीन दुचाकी चोरीच्या घटना घडल्या.

अमरावती : ग्रामीण भागात दुचाकीचोरांना आळा घालण्यात पोलिसांना यश आलेले नाही. दर्यापूर, शिरसगाव व परतवाडा ठाण्याच्या हद्दीतून तीन दुचाकी चोरीच्या घटना घडल्या.
शेखर विनायक गणोरकर (रा. शिरसगावकसबा) यांची एमएच 27 एटी 3327 कमांकाची दुचाकी घरासमोरून चोरीस गेली. अंबिकानगर कांडली येथील हेमलता पंजाब सोनार या महिलेची एमएच 27 एझेड 0146 क्रमांकाची दुचाकी घरासमोरील लोखंडी गेट तोडून लंपास केली. तिसऱ्या घटनेत साईनगर दर्यापूर येथील विवेक रामधन घाटे यांची एमएच 27 एजे 8043 क्रमांकाची दुचाकी पीठगिरणीसमोरून चोरीस गेली. शहरातही दुचाकीचोरी सुरूच आहे. नंदनवन कॉलनी, चपराशीपुरा येथून बंडू कृष्णराव अडोकार (रा. गगलानीनगर) हे नातेवाइकांकडे गेले असता त्यांची एमएच 27 टी 0253 क्रमांकाची दुचाकी चोरीस गेली. फ्रेजरपुरा पोलिसांनी त्यात गुन्हा दाखल केला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two-wheeler thieves active in Amravati district

टॅग्स