गोंदिया : नदीत नाव उटलून दोन महिला मजुरांचा मृत्यू

घोनाडीजवळच्या गाढवी नदीतील घटना
Two women workers die boat capsize gadhavi river
Two women workers die boat capsize gadhavi riversakal

देवरी : घोनाडीजवळच्या गाढवी नदीत नाव उलटून दोन महिला मजुरांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी (ता. २८) सायंकाळच्या सुमारास घडली. रेखा विजय वाढई (वय ३०) व मनीषा दिनेश गुरनुले (दोघीही रा. घोनाडी) अशी मृतांची नावे आहेत.घोनाडी गावाला लागून गाढवी नदी आहे. तिला लागूनच गोठणगाव धरण आहे. धरणाला बंधारा बांधल्यामुळे नदीला थोप आहे. त्यामुळे नदीत भरपूर पाणी आहे. तथापि, सोमवारी सकाळी नदीपलिकडील शेतात भाजीपाला लागवडीकरिता घोनाडी येथील नऊ ते दहा महिला व पुरूष नावे गेले होते. सायंकाळी परत घरी येताना नदीत नाव उलटली. यात रेखा वाढई व मनीषा गुरनुले या दोघींचा बुडून मृत्यू झाला. नावेवरील अन्य लोकांना पोहता येत असल्याने ते थोडक्यात बचावले. मृत रेखा वाढई हिला पाच वर्षाचा, तर मनीषा गुरनुले हिला दहा वर्षाचा मुलगा आहे. या घटनेची नोंद चिचगड पोलिसांनी केली असून, पुढील तपास पोलिस हवालदार होरे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com