अंजनगावात गोवंश हत्येचा प्रकार उघड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 मार्च 2019

अंजनगावसुर्जी (जि. अमरावती) ः अंजनगाव पोलिसांनी मंगळवारी (ता. 5) सकाळी येथील बुधवारा परिसरातील एका घरात छापा टाकून गोवंशाची कत्तल होत असताना दोघांना रंगेहाथ पकडले. घटनास्थळावरून जनावरांच्या कत्तलीच्या साहित्यासह कापलेले मांस व कटाईसाठी बांधून असलेल्या तीन कालवडी, चार गोऱ्हे जप्त केले.

मोहम्मद निसार अब्दुल मजीद (वय 48) व महंमद जावेद अब्दुल मुनाफ (वय 25) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक नरेश पारवे, उपनिरीक्षक प्रमोद खोब्रागडे व किशोर घुगे यांच्या पथकाने पशुवैद्यकीय अधिकारी श्‍याम टाले यांच्यासह बुधवारा परिसरातील मोहम्मद निसार अब्दुल मजीद यांच्या घरी धाड टाकली. या वेळी गोवंश जनावर कापलेले दिसले व मोहम्मद जावेद अब्दुल मुनाफ याला कापताना रंगेहाथ पकडले. घटनास्थळी असलेले कत्तलीचे साहित्य, कापलेले मांस, कत्तल करण्याच्या हेतूने बांधून ठेवलेल्या तीन कालवडी व चार गोऱ्हे असा एकूण 39 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मोहम्मद निसार अब्दुल मजीद व मोहम्मद जावेद अब्दुल मुनाफ या दोघांना अटक केली. पोलिस
आता होणार नियमित तपासणी
पोलिस पथकाच्या आजच्या कारवाईत पशुहत्या झाल्याचे मांस जप्त तर केलेच; परंतु गोवंशातील सात मुक्‍या जनावरांचे जीव वाचले. यापुढे या प्रकारासंदर्भात नियमित तपासणी केली जाईल, असे पोलिस निरीक्षक नरेश पारवे यांनी सांगितले.

Web Title: The type of murder of cow slaughter in Anjangoan