यू-ट्यूबवरून शिकला घरफोडी

यू-ट्यूबवरून शिकला घरफोडी
नागपूर : गिट्टीखदान पोलिसांनी चोरीच्या प्रकरणात दोन तरुणांना अटक केली. यामधील एक तरुण फूड डिलिव्हरी करणाऱ्या एका कंपनीत काम करीत होता. दोन्ही आरोपींनी चोरी करण्याचे प्रशिक्षण यू-ट्यूब व्हिडिओ पाहून घेतले होते, हे विशेष. अटकेतील आरोपींमध्ये जगदीशनगर निवासी शुभम कमल डहरवाल (19) आणि सचिन नत्थूलाल डहरवाल (18) यांचा समावेश आहे.
आकारनगर निवासी शुभदा प्रशांत खांडेकर (55) यांच्या दोन मुली पुणे येथे राहतात. घरात एकाकीपणा जाणवत असल्याने मागील एक महिन्यापासून शुभदा आपल्या माहेरी गोपालनगर येथे राहत होत्या. 14 सप्टेंबरला त्यांना शेजाऱ्यांनी सांगितले की, दोन चोरांनी त्यांच्या घरात चोरी केली आहे. शुभदा यांनी घरी येऊन बघितले असता 53 हजारांचा मुद्देमाल चोरी झाला होता. त्यांनी गिट्टीखदान ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. रात्रीला गस्तीदरम्यान गिट्टीखदान पोलिसांच्या एका पथकाला दोन तरुण संशयास्पदरीत्या दुचाकीवर जाताना दिसले. थांबण्याचा इशारा केला असता त्यांनी पळ काढला. पाठलाग करून पोलिसांनी दोघांनाही पकडले. ही कारवाई पोलिस हवालदार युवराज ढोले, इमरान शेख, संतोष शेंद्रे आणि आशीष बावनकर यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com