उद्‍धव ठाकरे यांच्‍या मुख्यमंत्रीपदासाठी महिनाभर उपवास

for Uddhav Thackeray became Chief Minister he take fast
for Uddhav Thackeray became Chief Minister he take fast

खामगाव (जि.बुलडाणा) : कडवट शिवसैनिक म्‍हणून परिचित असलेले शिरसगाव देशमुख येथील कृष्णराव देशमुख (वय 62) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्‍धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी उपवास ठेवला होता. ठाकरे कुटुंबावरील असलेल्या प्रेमाबाबत देशमुख यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

राज्‍यात विधानसभेच्‍या निवडणुका झाल्‍यानंतर मुख्यमंत्री कोण होईल याबाबत कमालीची उत्‍सुक्‍ता होती. शिवसेना कार्याध्यक्ष उद्‍धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्रीपद मिळावे अशे सर्वसामान्‍य शिवसैनिकांच्‍या मनात होती. खामगाव तालुक्‍यातील शिरसगाव देशमुख येथील रहिवासी असलेले कृष्णराव देशमुख यांनी उद्‍धव ठाकरेंच्‍या मुख्यमंत्रीपदासाठी चक्‍क महिनाभर उपवास केला. (ता.28) ऑक्‍टोबरपासून महिनाभर त्‍यांनी फक्‍त अल्‍प फराळाचे सेवन करून उपवास पूर्ण केले.

सच्चे शिवसैनिक
देशमुख अनेक वर्षापासून राजकारणात सक्रिय आहेत. परिसरात कडवे आणि सच्चे शिवसैनिक म्‍हणून त्‍यांना ओळखले जाते. (ता.24) ऑक्टोबरला उद्‍धव ठाकरे यांची पत्रकार परिषद एल्‍यानंतर सेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाची मागणी पुढे आल्‍याने जोपर्यंत शिवसेनेचे कार्याध्यक्ष मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत आपण उपवास करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. (ता.28) ऑक्‍टोबर ते (ता.28) नोव्‍हेंबर पर्यंत त्‍यांनी उपवास केला. त्‍याची दखल घेत येत्‍या 16 ते 21 तारखेपर्यंत नागपूर येथे हिवाळी अधिवेशन असून (ता.19) ते (ता.21) कालावधीत त्‍यांना नागपुरला नेवून खा. प्रतापराव जाधव यांच्‍या नेतृत्‍वात उद्‍धव ठाकरे यांची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्‍न करणार असल्‍याची माहिती शिवसेनेचे उपजिल्‍हाप्रमुख संजय अवताडे यांनी दिली.

उपवासामुळे तब्येत खालावली
कृष्णराव देशमुख हे शिवसेनेच कडवट आणि निष्ठावान कार्यकर्ते आहेत. त्‍यांनी आजवर शिवसेना व मित्रपक्षाशिवाय कोणत्‍याही पक्षाला मतदान केले नाही. यंदा त्‍यांनी उद्‍धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्‍हावे याकरिता महिनाभर उपवास ठेवला. यादरम्‍यान त्‍यांची तब्‍बेतही खालावली होती. महिनाभरात त्‍यांनी जेवण न करता फराळावर उपवास केला.
- बळीराम वानखडे, माजी सरपंच, शिरसगाव देशमुख

देशमुख जातील पंढरीला
कृष्णराव देशमुख यांची परिस्‍थिती अत्‍यंत हलाखीची आहे. तरी सुध्दा त्‍यांची पक्षावरील निष्ठा कायम आहे. उद्‍धव ठाकरे मुख्यमंत्री व्‍हावे यासाठी त्‍यांनी एक महिना उपवास केला आणि आपली ईच्‍छा पूर्ण झाली म्‍हणून पंढरपूर येथे जावून आपला नवस पूर्ण करणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com