उद्धव ठाकरेंची सरसंघचालकांशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

नोटाबंदीसह शेतकऱ्यांच्या विषयावर तासभर खल
नागपूर - शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेऊन तासभर त्यांच्याशी नोटाबंदी, शेतकऱ्यांची स्थिती आणि अन्य विषयांवर चर्चा केली. या वेळी युवा नेते आदित्य ठाकरेही उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कन्या केतकी यांच्या विवाहासाठी उद्धव ठाकरे आज शहरात आले होते. नागपुरात आल्यानंतर त्यांनी रेशीमबागेतील स्मृती मंदिर परिसरात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. नोटाबंदीमुळे सामान्य नागरिक होरपळला जात आहे, त्यामुळे शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेबाबतची पार्श्‍वभूमी डॉ. भागवत यांच्यासमोर मांडली, असे उद्धव ठाकरे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. याशिवाय शेतकऱ्यांची स्थिती, राजकीय विषयावरही चर्चा झाल्याचे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे आणि सरसंघचालक डॉ. भागवत यांच्यात तासभर झालेल्या चर्चेदरम्यान आदित्य ठाकरेही उपस्थित होते. ठाकरे यांनी या वेळी इतर विषयांवर झालेल्या चर्चेचा तपशील देण्यास मात्र नकार दिला. चर्चेची थोडक्‍यात माहिती देताना त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानाचे भाव नोटाबंदीवर घेतलेल्या भूमिकेवर संघाची कुठलीही तक्रार नसल्याचे संकेत देत होते.

Web Title: Uddhav Thackeray discussion with mohan bhagwat