उद्धव ठाकरे नागपुरातून करणार प्रचाराचा शंखनाद 

उद्धव ठाकरे नागपुरातून करणार प्रचाराचा शंखनाद 

नागपूर - लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची येत्या 2 फेब्रुवारीला नागपुरात महारॅली आयोजित केली आहे. विदर्भातील 10 लोकसभा मतदारसंघांतून पदाधिकारी व शिवसैनिकांना या महारॅलीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ही महारॅली विदर्भातील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शंखनाद ठरणार आहे. 

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लोकसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्‍यता आहे. यापूर्वी भाजप-सेना युती होणार काय? या प्रश्‍नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. युती होणार नाही, असे बोलले जात असले तरी आता नेते मात्र युती होण्याची शक्‍यता आहे, असा राग आळवत आहेत. यामुळे येत्या दोन फेब्रुवारीला नागपुरात होणाऱ्या उद्धव ठाकरे महारॅलीत काय आदेश देतात, याकडे साऱ्या शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. 

विदर्भातील लोकसभेचे 10 मतदारसंघ असून त्यापैकी 4 मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. युती फिस्कटल्यास विदर्भात आणखी 6 उमेदवार शिवसेनेला द्यावे लागणार आहेत. उद्धव ठाकरे यांची नागपुरातील महारॅली यशस्वी करण्यासाठी शिवसैनिक कामाला लागले आहेत. यासंदर्भात शिवसेनेचे पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुख खासदार गजानन कीर्तिकर यांनी नागपुरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. उद्धव ठाकरे यांची महारॅली यशस्वी करण्यासाठी विदर्भातील सारे शिवसैनिक कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत युती होणार काय? याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच निर्णय घेतील, असे खासदार गजानन कीर्तिकर यांनी सांगितले. 

खासदार कीर्तिकर यांनी विदर्भातील जिल्हा शिवसेना प्रमुख व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार सुरेश धानोरकर, नागपूर जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश जाधव, माजी उपमहापौर शेखर सावरबांधे, किशोर कुमेरिया उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com