ठाकरेंचा विरोध आकसपूर्ण - डॉ. देशमुख

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

नागपूर - राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याच्या सरकारच्या निर्णयाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दर्शविलेला विरोध अनाठायी आणि त्यांचा विदर्भाप्रती असलेला आकस व्यक्त करणारा आहे, असे मत भाजपचे काटोलचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी व्यक्त केले.

विदर्भाच्या हिताचे निर्णय मुंबईत बसून घेता येऊ शकतात. त्यामुळे मुंबईतच पावसाळी अधिवेशन व्हावे, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. त्यांच्या या मतामागे कोणती तर्कबुद्धी कारणीभूत आहे, हे कळायला मार्ग नाही, असे डॉ. देशमुख म्हणाले.

Web Title: uddhav thackeray oppose dr. ashish deshmukh politics