उद्धव ठाकरेंना नाणार रिफायनरी कोकणात नको - डॉ. आशीष देशमुख

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

नागपूर - शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीच आता नाणार प्रकल्प विदर्भात घेऊन जा, असे जाहीरपणे सांगितल्याने तो आता काटोलमध्ये आणावा, अशी मागणी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केली. कोकणवासीयांचा विरोध असल्याने हा प्रकल्प विदर्भात आणावा याकरिता आपण यापूर्वीच मुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितले. 

नागपूर - शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीच आता नाणार प्रकल्प विदर्भात घेऊन जा, असे जाहीरपणे सांगितल्याने तो आता काटोलमध्ये आणावा, अशी मागणी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केली. कोकणवासीयांचा विरोध असल्याने हा प्रकल्प विदर्भात आणावा याकरिता आपण यापूर्वीच मुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितले. 

आमदार आशिष देशमुख म्हणाले, औद्योगिक विकासासाठी काटोल तालुक्‍यात पंधरा हजार एकर जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने प्रस्तावित केली आहे. तसेच येथे सर्व पायाभूत सुविधा असून पाण्याचे साठे, विजेचे जाळे, जंगल, रेल्वे सेवा तसेच काटोल हे नागपूरपासून जवळ असल्याने काटोल रिफायनरीसाठी सर्वोत्तम जागा असल्याचे देशमुख यांनी सांगितले. राज्य शासनातर्फे नागपूर-मुंबई समृद्धी मार्गाची निर्मिती केली जात आहे. यासाठी लागणारा पेटकोट, सिंथेटिक यार्न व डांबर निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल या प्रकल्पातून उपलब्ध होईल. विदर्भातील 20 ते 22 हजार युवकांना प्रत्यक्ष तर चाळीस ते 45 हजार युवकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल, असेही देशमुख यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात सांगितले होते. 

पुढे ते म्हणाले, औद्योगिक विकास व रोजगारासाठी विदर्भ अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहे. रिफायनरीच्या निमित्ताने रोजगार निर्मिती होईल, तरुणांचे नोकरीसाठी होणारे स्थलांतर थांबेल, शेतकरी आत्महत्या कमी होतील तसेच राज्यातील पेट्रोलियम पदार्थाच्या किमती कमी होतील. यासाठी मुख्यमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व हा प्रकल्प लवकर विदर्भात आणण्याची मागणी केली. तसेच काल झालेल्या जाहीर सभेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा प्रकल्प विदर्भात हलविण्याची सहमती दिली दर्शविली. 

नागपुरात मिहान, कार्गो हब, पतंजली फूड पार्क यांसारखे प्रकल्प रखडलेले आहेत. त्यामुळे तरुणांना रोजगासाठी पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी स्थलांतर करावे लागते. नाणार प्रकल्प महाराष्ट्राचा असून, तो राज्यातच राहावा. तो गुजरामध्ये जाऊ नये याकरिता मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावे. 
आशिष देशमुख 

Web Title: Uddhav Thackeray refinery not in Konkan