
हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल. त्यानंतर सत्काराला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी जनतेला प्रश्न केला की, तुम्हाला पाच वर्षे टिकणारे सरकार पाहिजे आहे की? पुढचे दहा, पंधरा, पंचेवीस वर्षे टिकणारे? त्यावर उपस्थित जनतेने 25 असे म्हणतात जल्लोष केला. त्यानंतर पिढ्यानपिढ्या महाविकास आघाडीचे सरकार येईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
नागपूर : मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे रविवारी (ता. 15) संत्रानगरीत प्रथम आगमन झाले यानिमित्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पुढचे पंधरा, पंचवीस वर्षे टिकेल, असा विश्वास व्यक्त केला.
मुख्यमंत्री झाल्यानंतर संत्रानगरीत प्रथम आगमनानिमित्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर उद्धव ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन राऊत म्हणाले, हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल. त्यानंतर सत्काराला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी जनतेला प्रश्न केला की, तुम्हाला पाच वर्षे टिकणारे सरकार पाहिजे आहे की? पुढचे दहा, पंधरा, पंचेवीस वर्षे टिकणारे? त्यावर उपस्थित जनतेने 25 असे म्हणतात जल्लोष केला. त्यानंतर पिढ्यानपिढ्या महाविकास आघाडीचे सरकार येईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
महत्त्वाची बातमी - ठाकरे सरकार नव्हे, हे तर "स्थगिती सरकार', देवेंद्र फडणवीसांनी उडविली खिल्ली
"माझ्या महाराष्ट्राला अधिक फटके देऊ नको'
मुख्यमंत्री भाषणाला उभे होताच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तेव्हा "थांब अरे बाबा आता माझ्या महाराष्ट्राला अधिक फटके नको देऊ', अशी विनवणी त्यांनी वरुणराजाला केली. उद्यापासून खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री म्हणून माझ्या कारकिर्दीला सुरुवात होणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले प्रशासकीय कामाचा मला पूर्ण अनुभव नसला तरीही सहकारी आणि मायबाप जनता माझ्यासोबत आहे. त्यामुळे अख्ख्या देशाला हेवा वाटेल असे हे सरकार सिद्ध होईल, अशी खात्री त्यांनी यावेळी व्यक्त केली.