smart-city
smart-city

अनधिकृत घरेही होणार नियमित

नागपूर - पूर्व नागपुरातील भरतवाडा, पूनापूर, पारडी, भांडेवाडी येथे स्मार्ट सिटीअंतर्गत आतापर्यंत गुंठेवारीतही नियमित होऊ न शकणारे अनधिकृत बांधकाम नियमित होणार आहे. या प्रकल्पात काहींची घरे तर काहींची जागा जाणार असून त्यांना त्याच परिसरात पुनवर्सन तसेच नुकसानभरपाई देण्यात येणार असून सरकारने या प्रकल्पाचा मार्ग मोकळा केला. 

स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत पूर्व नागपुरात १७०० एकर जागेचा विकास करण्यात करणार आहे.  या प्रकल्पाच्या टाऊन प्लानिंग स्किमला राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. टाऊन प्लानिंग स्किमपूर्वी या परिसरातील नागरिकांकडून सूचना, हरकत मागविण्यात आली होती. स्मार्ट सिटी एसपीव्हीचे सीईओ डॉ. रामनाथ सोनवणे यांनी नागरिकांशी चर्चा केली.

नागरिकांच्या सूचनांचा समावेश करीत टाऊन प्लानिंग स्किम तयार करण्यात आली. हा आराखडा नासुप्रकडे व त्यानंतर नासुप्रने सरकारकडे सादर केला होता. जुन्या आराखड्यानुसार ४४०० घरे विकासात बाधित होणार होते. मात्र, नागरिकांशी चर्चेनंतर आता केवळ हजारपेक्षाही घरे बाधित होणार असून त्यांना सर्वप्रथम सिमेंटची पक्की घरे देऊन त्यांचे पुनर्वसन त्याच परिसरात करण्यात येणार असल्याचे  डॉ. सोनवणे यांनी ’सकाळ’सोबत बोलताना नमुद केले. 

रस्त्यांमध्ये घरांचा किंवा दुकानांचा काही भाग पाडावा लागल्यास त्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. एखाद्याची जागा प्रकल्पात येत असेल तर त्याला ६० टक्के जागा देण्यात येणार आहे. सरकारने मंजूर केलेल्या नव्या टीपी स्किममध्ये नागरिकांचे कमीत कमी नुकसान होईल, यावर भर देण्यात आला असून प्रकल्पातील ५२ किमीच्या रस्त्यांपैकी ४५ किमी रस्त्यांवरील घरे पाडण्यात येणार नसल्याचेही ते म्हणाले. विशेष म्हणजे ग्रीन बेल्ट व नो डेव्हलपमेंट झोनमधील अनधिकृत घरेही नियमित होणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

आर्थिक, सामाजिक सर्वेक्षण करणार 
ज्यांची घरे, दुकाने बाधित होणार आहे, त्यांचे आर्थिक, सामाजिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. एखाद्याचे दुकान बाधित होत असेल तर त्या दुकानातील कर्मचाऱ्यांचीही नोकरी जाते. मात्र, या सर्वेक्षणातून या कर्मचाऱ्याचे जे नुकसान होईल, त्याची आकडेवारी काढली जाणार असून तेवढी भरपाईही दिली जाईल. दुकानदारालाही भरपाई मिळेल.

एवढ्या वेगाने तयार होत असलेला देशातील पहिला स्मार्ट सिटी प्रकल्प असून यात कुणाचेही नुकसान होणार नाही. बाधितांचे तेथेच पुनर्वसन करण्यात येणार आहे तर थोडेफार नुकसान होत असल्यास भरपाई देण्यात येणार असून भूमिपूजन लवकरच होणार आहे. 
- कृष्णा खोपडे, आमदार, पूर्व नागपूर. 

प्रकल्प आकडेवारीत 
 प्रकल्पासाठी आलेला निधी - ४३५ कोटी 
 केंद्राकडून मिळालेला निधी - १७० कोटी
 राज्य सरकारने दिलेला निधी - १४५ कोटी
 नासुप्रने दिलेला निधी - १०० कोटी
 आतापर्यंत खर्च - ११० कोटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com