काका-पुतण्याची एकाच दिवशी मालवली प्राणज्योत

सुधीर बुटे 
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

काटोल - नागपुरातील वैद्यकीय रुग्णालयात चव्हाण कुटुंबीयांसाठी मंगळवार काळ वार ठरला. वेगवेगळ्या अपघातांत जखमी झालेल्या काका-पुतण्याचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने कुटुंबासह दोघांच्याही गावात ही वार्ता पोहचताच शोककळा पसरली. 

तालुक्‍यातील दुधाळा त्रिमूर्ती विद्यालयाचे शिक्षक रमेश गोशाजी चव्हाण (वय ४८, रा. दुधाळा) व हिंगणा तालुक्‍यातील आगरगाव (तांडा) येथील एकनाथ दुर्गादास चव्हाण (वय ३५) हे काका-पुतणे वेगवेगळ्या अपघातांत जखमी झाले होते. त्यांच्यावर नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू होते.  

मिळालेल्या माहितीनुसार, काका रमेश चव्हाण यांचा गत रविवारी (ता. १०) नागपूर मार्गे दुधाळा येथे दुचाकीने येत असताना चमेली शिवारातील साईमंदिराजवळ अपघात झाला. त्यांच्या डोक्‍याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. सोमवारी सकाळी त्यांना उपचारासाठी नागपूर मेडिकल येथे हलविले. उपचारादरम्यान त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. आठ दिवस उपचारानंतर  मंगळवारी दुपारी ३ वाजता त्यांचे निधन झाले.

आगरगाव येथे मंगळवारी (१२ फेब्रुवारी) एकनाथ शेतातून अपंग वडिलांना आणण्यासाठी जात असताना दुचाकी घसरल्याने गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावरही मेडिकलमध्ये उपचार सुरू होते. आज मंगळवारी सकाळी एकनाथचा मृत्यू झाला. 

दोघांच्या पार्थिवावर आपापल्या गावी 
अंतिम संस्कार पार पडले. रमेश चव्हाण यांचा मुलगा हर्षल रशिया येथे एमबीबीएस अंतिम वर्षाला तर धाकटा प्रथमेश नागपूर येथे शिक्षण घेत आहे. एकनाथ शेतकरी असून त्याला २ मुली व पाच महिन्यांचा मुलगा आहे. 

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Web Title: uncle & nephew dead in accident