14 वर्षीय पुतणीवर बलात्कार; शिक्षिकेच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस

Uncle raped his fourteen year old niece at nagpur
Uncle raped his fourteen year old niece at nagpur

नागपूर - आर्थिक स्थिती बेताची असल्याने शिक्षणासाठी काकाच्या घरी राहत असलेल्या 14 वर्षीय पुतणीवर पित्यासमान असलेल्या काकानेच बलात्कार केला. हा प्रकार शाळेतील शिक्षिकेच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. या प्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी नराधम काकाला अटक केली. शेषराव (वय 43) असे आरोपीचे नाव आहे. 

पीडित 14 वर्षीय मुलगी अश्‍विनी (बदललेले नाव) ही मूळची भीवापूरची आहे. तिचे आई-वडील शेतमजुर आहेत. वडीलाची आर्थिक परिस्थिती योग्य नसल्यामुळे अभ्यासात हुशार असलेल्या अश्‍विनीला शिक्षणासाठी नागपूरला काकाकडे पाठविले. आरोपी शेषराव हा धनाढ्य असून मेडिकल कॅम्प आयोजित करून पैसा कमवितो. त्याला पत्नी व मुलगा आहे. त्याच्याकडे मृत पावलेल्या मोठ्या भावाची 19 वर्षाची मुलगीसुद्धा शिक्षणासाठी आहे. शेषराव हा कुप्रवृत्तीचा असून विक्षिप्त आहे. गेल्या काही महिन्यांपासून अश्‍विनीशी तो अश्‍लिल चाळे करीत होता. रात्रीच्या सुमारास अश्‍विनीच्या रूममध्ये घुसून तिचे लैंगिक शोषण करीत होता. अश्‍विनीने लैंगिक शोषणास नकार दिल्यास शिक्षण बंद करून वडीलाकडे शेतीच्या कामासाठी पाठविण्याची धमकी काका देत होता. त्यामुळे घाबरलेली अश्‍विनी गप्प राहून अत्याचार सहन करीत होती. 

शिक्षिकेने केला भंडाफोड 
नवव्या वर्गात शिकत असलेली अश्‍विनी गेल्या काही दिवसांपासून अबोल होती. ही बाब शिक्षिकेच्या लक्षात आली. शिक्षिकेने तिची आस्थेने विचारपूस केली. त्यानंतर अश्‍विनी ढसाढसा रडायला लागली. तिने काकाचे कुकृत्य शिक्षिकेला सांगितले. शिक्षिकेने मुख्याध्यापकाला सांगितले. त्यांनी हुडकेश्‍वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून शेषरावला अटक केली. 

मुलीची निरीक्षणगृहात रवानगी 
आईवडील मजूर असल्यामुळे दोन वेळेसचे जेवनाची कशीबशी सोय होते. आता काकानेही मुलीचे भविष्य बरबाद केले. हुडकेश्‍वर पोलिसांनी मुलीला निरीक्षणगृहात ठेवले असून तिची उद्या सोमवारी चाईल्ड हेल्प लाईन अधिकारी आणि बाल संरक्षण अधिकाऱ्यांसमोर बयाण घेण्यात येणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com