नोकरीसाठी वेबसाईटवर संपर्क करताय, जरा थांबा... तुमच्यासोबतही होऊ शकतो हा धोका, वाचा सविस्तर

Unemployed young man cheated by Rs 88,200
Unemployed young man cheated by Rs 88,200

अमरावती : लॉकडाउनच्या काळात सर्वच क्षेत्रात बेरोजगारी वाढल्यामुळे हवी ती नोकरी मिळविण्यासाठी धोका पत्करायलाही युवापिढी मागेपुढे बघत नाही. या काळात अनेकांना नोकरी तर सोडाच आर्थिक फटकाच बसल्याचे दिसून येते. कोरोनामुळे अर्थचक्र मंदावले असून, जो तो नोकरीच्या शोधात आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या अशाच एका तरुणाला चांगलाच फटका बसला. 

राहुल सुरेश मेश्राम (वय २०, रा. यशोदानगर नंबर-एक), असे फसवणूक झालेल्या बेरोजगाराचे नाव आहे. राहुलने १० जून रोजी एका वेबसाईटवर जाऊन नमूद मोबाईल क्रमांकावर संपर्क केला. त्याला संबंधित अनोळखी व्यक्तीने नोकरी मिळेलच, अशी बतावणी करून त्याचा विश्वास संपादन केला. पहिल्या टप्प्यात राहुलने ज्या व्यक्तीशी संपर्क साधला त्याने मूळ दस्तऐवज मागितले. दस्तऐवज प्राप्त झाल्यानंतर पुन्हा त्याच अनोळखी व्यक्तीने नोंदणी शुल्कासह इतरही विविध कारण सांगून दोन व्यक्तींचे बँकखाते क्रमांक राहुल यास पाठवून त्या खात्यांत ऑनलाइन रक्कम भरण्यास सांगितले. 

अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून राहुलने १९ जून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत टप्प्याटप्याने ८८ हजार दोनशे रुपये दोन्ही खात्यात जमा केली. त्यानंतर सदर व्यक्तीने राहुलचा कॉल रिसिव्ह न करता टाळाटाळ सुरू केली. नोकरीच्या नावाने आपली फसवणूक झाली, अशी तक्रार त्याने आयुक्तालयाच्या सायबर ठाण्यात नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
 

अधिकृत वेबसाइटवरच जा
नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणा-या ज्या अधिकृत वेबसाइट आहेत, त्यांचाच नंबर सर्च करायला हवा. बरेच जण चुकीचा नंबर सर्च करून संपर्क साधत असल्याने तोतयांच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळेच आर्थिक फसवणूक होते.
-रवींद्र सहारे, सहायक पोलिस निरीक्षक, सायबर ठाणे, अमरावती.

संपादन : अतुल मांगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com