केंद्रीय अर्थमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

जिल्हा बॅंकेवरील निर्बंध उठविण्याची मागणी; महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने घेतली जेटली यांची भेट
नागपूर - केंद्र सरकारने घेतलेल्या चलनबंदीच्या निर्णयानंतर राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांवर घालण्यात आलेले निर्बंध उठविण्यासह या बॅंकांना जास्तीत जास्त चलनपुरवठा करण्याच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाला दिले. याबाबत जेटली यांनी नाबार्डशी चर्चा केली असून, ते उद्या रिझर्व्ह बॅंकेशी चर्चा करणार आहेत.

केंद्र सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या चलनी नोटा व्यवहारातून बाद ठरवल्यानंतर या संदर्भात होणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांमधील व्यवहारांवर निर्बंध घातले आहेत. जिल्हा बॅंकांवरील हे निर्बंध उठवण्यासोबतच त्यांना अधिकाधिक चलनपुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी सर्वच पक्षांकडून करण्यात आली आहे. त्यावर बुधवारी विधिमंडळात चर्चा झाली. चर्चेला उत्तर देताना राज्याचे शिष्टमंडळ घेऊन जेटली यांची भेट घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ जेटली यांना नवी दिल्ली येथे भेटले. राज्यात जिल्हा सहकारी बॅंकांचे मोठे जाळे असून, ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था या बॅंकांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. या बॅंका रिझर्व्ह बॅंकेच्या सर्व नियमांचे पालन करतात. मात्र, या बॅंकांमधून होणारे व्यवहार बंद झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना विशेषत: शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अडचणी येत आहेत, हे अर्थमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. केंद्रीय मंत्री जेटली यांनी याबाबत सकारात्मक आणि सहानुभूतीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Union finance ministers responded positively