विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जुलै 2016

सोलापूर - सोलापूर विद्यापीठ या वर्षापासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवत आहे. ही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांना अडचणीची ठरत असून विद्यापीठाने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया थांबवून ऑफलाइन पद्धतीने राबवावी, अशी मागणी भारतीय विद्यार्थी सेनेमार्फत करण्यात आली.

कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांना या संबंधीचे निवेदनही देण्यात आले. ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया संपूर्ण जिल्ह्यात राबवायला हवी होती. ती फक्त शहरातील महाविद्यालयातच राबविली जात आहे. विद्यार्थ्यांना आकारत असलेल्या शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे. ही शुल्क वाढ मागे घेण्यात यावी. जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना फी माफी करण्यात यावी. मागील वर्षी विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेली फी परत देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी सेनेने कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांच्याकडे केली.

Web Title: University admission process to make offline