डी. लिट.ला विद्यापीठ करणार "डिलीट'

File photo
File photo

डी. लिट.ला विद्यापीठ करणार "डिलीट'
नागपूर : आचार्य पदवी संपादन केल्यावर पुढील संशोधन करीत शोधप्रबंध सादर करणाऱ्यांना "डी. लीट' आणि "डी. एससी' या सर्वोच्च पदवीने सन्मानित केले जाते. आजपर्यंत बऱ्याच दीक्षान्त समारंभात विद्यापीठातील नामवंत अभ्यासकांनी केलेल्या संशोधनाला या पदवीने सन्मानित केले आहे. मात्र, आता ही पदवीच विद्यापीठातून "डिलीट' करण्याचा विचार विद्यापीठ करीत आहे. तसा प्रस्तावही "बोर्ड ऑफ डिन्स'मध्ये आणण्यात येणार असल्याची माहिती प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.
विद्यापीठात दोन प्रकारे डी. लीट. पदवीने सन्मानित केल्या जाते. यात समाजात विविध श्रेत्रांत उत्कृष्ट काम करणाऱ्यांना मानद डी. लिट. तर संशोधनात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या शोधप्रबंधाच्या आधारावर या पदवीने सन्मानित केले जाते. 1994 च्या कायद्यात याबद्दल नियमावली तयार करण्यात आली होती. मात्र, नव्या कायद्यात त्याबद्दल कुठलाच उल्लेख नाही. शिवाय राज्यातील इतर विद्यापीठांनी ही पदवीच बंद केल्याची माहिती आहे. दुसरीकडे नुकतेच राज्य शासनाने पाठविण्यात आलेल्या "स्टॅट्युट'मध्येही याचा उल्लेख दिसत नाही. त्यामुळे इतर विद्यापीठांप्रमाणे आपणही ही सर्वोच्च पदवी बंद करावी काय? या मानसिकतेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आले आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाकडे "डी. लीट.'साठी 25 शोधप्रबंध विद्यापीठाकडे आले आहेत. तेव्हा कुणाला ही पदवी द्यायची हा प्रश्‍न आहे. त्यातूनच हा प्रस्ताव विचाराधीन आहे. पुढल्या आठवड्यात "बोर्ड ऑफ डिन्स' बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये या प्रस्तावावर चर्चा करण्यात येणार आहे. यानंतर प्रस्ताव विद्वत परिषदेमध्ये मान्यतेसाठी जाणार आहे.
मानद डी. लिट. कायम
विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्‍तींना "डी. लिट.' पदवी देण्यात येत असते. सध्या संशोधनातील डी. लिट. पदवी रद्द करण्याचा विचार विद्यापीठ करीत असताना, मानद डी. लिट. देण्याची परंपरा कायम ठेवण्यात येणार असल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com