नागपूर विद्यापीठ शिकविणार आता संघाचा इतिहास

rss
rss

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे संघाचा इतिहास पुस्तकामध्ये समाविष्ट करण्याचे काम केले जात आहे. नुकतेच बी. ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात ‘संघाचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान’ या आशयाचे प्रकरण समाविष्ट केले आहे. या प्रकाराने पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे अभ्यासमंडळांवर शिक्षण मंचचे वर्चस्व असल्यानेच हा प्रकार होत असल्याची चर्चा आता विद्यापीठात रंगू लागली आहे. दुसरीकडे या प्रकाराने राजकीय वादाला तोंड फुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

विद्यापीठाच्या पदव्युत्तर इतिहास अभ्यासक्रमात स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबद्दल स्वतंत्र पुस्तकाचा समावेश आहे. या अभ्यासक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर पदवी अभ्यासक्रमात संक्षिप्त माहिती मिळावी या हेतूने १८८५ ते १९४७ या कालखंडात भारताचा इतिहास हा भाग शिकवताना ‘संघाचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान’ या प्रकरणाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे  बी. ए. अभ्यासक्रमातूनही संघाच्या योगदानाचे बाळकडू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. 

नागपुरात संघाचे मुख्यालय आणि सध्या विद्यापीठातील अभ्यासमंडळावर ‘शिक्षणमंच’चे वर्चस्व असल्याने संघाचा इतिहास शिकविणारे नागपूर विद्यापीठ हे राज्यातील प्रथमच विद्यापीठ ठरणार आहे.  मात्र, या प्रकरणामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षांकडून नेहमीच संघावर टीका केली जाते. संघाची  शिकवण ही कायद्याविरोधी आणि संविधानविरोधी असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जातो. शिवाय, भाजप सरकार सत्तेत आल्यापासून देशाचं भगवीकरण सुरू असल्याचा वाद नेहमीच चर्चेत आहे. असं असताना आता संघाचा इतिहास थेट विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश केला जात आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपण्याची चिन्हे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com