विद्यापीठाचा "अभाविप'ला पाठिंबा!

नागपूर : विद्यार्थी निवडणुकांच्या माहितीपुस्तिका जाळून निषेध व्यक्त करताना एनएसयूआय आणि राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे पदाधिकारी.
नागपूर : विद्यार्थी निवडणुकांच्या माहितीपुस्तिका जाळून निषेध व्यक्त करताना एनएसयूआय आणि राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे पदाधिकारी.

नागपूर : विद्यापीठात विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. ही निवडणूक निर्विघ्न पार पाडण्यासाठी विद्यापीठाकडून सर्वच विद्यार्थी संघटनांची शनिवारी (ता. सहा) दीक्षान्त सभागृहात बैठक बोलाविण्यात आली होती. मात्र, बैठकीत एनएसयूआय आणि राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठावर "अभाविप'ला मदत करण्यासाठी विद्यार्थी कल्याण संचालकपदावर शिक्षण मंचचे डॉ. अभय मुद्‌गल यांची निवड केल्याचा आरोप केला. यावेळी सभेतून "वॉकआउट' करीत बाहेर माहितीपुस्तिका जाळत निषेध व्यक्त केला. विद्यापीठ कायदा 2016 नुसार विद्यापीठांमध्ये खुल्या निवडणुका घेण्यात येणार आहे. त्यासाठी 31 सप्टेंबरपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. या निवडणुका व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठीच विद्यार्थी संघटनांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैठकीत एनएसयूआय, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि इतर संघटनांचा समावेश होता. दरम्यान, कुलगुरू डॉ. सि. प. काणे यांनी निवडणुकांसंदर्भात माहितीपुस्तिका देत, महाविद्यालयात निवडणुका घेताना, कुठल्याही संघटनेचा सहभाग नसणार असल्याचे सांगितले. तसेच प्रतिनिधींचा प्रचारही करणास मनाई आणि एका महाविद्यालय तीन ते चार प्रतिनिधीच एकाची कॉलेज प्रतिनिधी म्हणून निवड करणार असल्याचे स्पष्ट केले. यावर एनएसयूआयने आक्रमक भूमिका घेत, संपूर्ण निवडणुका खुल्या पद्धतीने म्हणजे सर्व विद्यार्थ्यांकडून मतदानाद्वारे घेण्याची मागणी केली. संघटनात्मक निवडणुका असल्याने विद्यार्थी संघटनाचा वावर असावा, अशी मागणी केली. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. अभय मुद्‌गल यांच्या निवडीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण केला. सिनेट निवडणुकांमध्ये एकत्र लढलेल्या "अभाविप' आणि शिक्षणमंच एकत्रितपणे लढल्या असल्याने विद्यार्थी निवडणुकांमध्ये अभाविपला फायदा देण्यासाठीच ही निवड करण्यात आल्याचा आरोप केला. यावेळी दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीतून बाहेर पडत माहितीपुस्तिका जाळून निषेध व्यक्त केला. तसेच विद्यापीठाविरोधात घोषणाबाजी केली.यावेळी एनएसयूआयकडून प्रदेश महासचिव अजित सिंग, शहराध्यक्ष आशीष मंडपे, उपाध्यक्ष अभिषेक सिंग, अमीर नूरी, शदाफ सोफी, प्रतीक कोल्हे तर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसकडून शहराध्यक्ष शैलेंद्र तिवारी, प्रदेश सचिव राहुल पांडे, शहराध्यक्ष रवी पराते, आकाश गजबे व पदाधिकारी सहभागी झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com