नोकरदारांना विद्यापीठाचा दिलासा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

नागपूर -: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून पीएचडी करणाऱ्या नोकरदारांवर आलेले संकट आता दूर झाले आहे. विद्यापीठाने अर्धवेळ पीएचडीकरिता तात्पुरती नियमावली तयार केली आहे. यानुसार नोकरदारांचा पीएच. डी. पूर्ण करण्याचा कालावधी साडेचार वर्षे करण्यात आला आहे. तसेच त्यांना ५०० तास संशोधन केंद्रावर घालवावे लागणार आहे. 

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिलेल्या निर्देशानुसार पीएच. डी.ला पूर्णवेळ अभ्यासक्रम असल्याचे नमूद करीत विद्यापीठाने नियमित केले. यामुळे पीएच. डी. करणाऱ्या नोकरदार वर्गासमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. आरआरसीनंतर त्यांना ३० दिवसांच्या आत तीन वर्षे सुटीचे प्रमाणपत्र द्यावे लागणार होते. असे न केल्यास त्याची नोंदणी रद्द केल्या जाणार होती. मात्र, यूजीसीने त्यानंतर जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये पूर्णवेळ आणि अर्धवेळ पीएच. डी.चा उल्लेख केला आहे. आतापर्यंत विद्यापीठाकडे अर्धवेळ पीएच. डी. करणाऱ्यांसाठी नियमावली अस्तित्वात नव्हती. यामुळे नोकरदारांचे पीएच. डी.चे स्वप्न भंगणार होते. मात्र, यूजीसीच्या दिशानिर्देशांचा अभ्यास करून विद्यापीठाने पूर्णवेळ आणि अर्धवेळ अशा दोन्ही स्वरूपातील पीएच. डी. करणाऱ्यांसाठी नियमावली तयार केली आहे. 

आरआरसी २६ पासून
पीएच. डी.करिता नोंदणी प्रक्रिया झाल्यानंतर त्यांना आपल्या शोधप्रबंधाचे सादरीकरण आणि समितीपुढे मुलाखत द्यावी लागणार आहे. याकरिता विद्यापीठामध्ये २६ ते २८ एप्रिलदरम्यान प्रक्रिया होणार आहे. दरम्यान, पात्र संशोधकांना आरआरसी समितीपुढे आपले शोधप्रबंधाचे सादरीकरण करावे लागणार आहे. यावेळी प्रत्येकाची मुलाखतसुद्धा घेण्यात येणार आहे. त्यानंतरच ते पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरतील.

Web Title: University working comfort

टॅग्स