उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयावर धडक

file photo
file photo

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कर्मचारी संघटनेतर्फे विद्यापीठ कर्मचाऱ्यांना शासनाने सातवा वेतन आयोग लागू करणे व अन्य मागण्या तातडीने मंजूर कराव्या, यासाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या चौथ्या टप्प्यात मंगळवारी (ता. 18) उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयावर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धडक दिली.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कर्मचारी संघटनेने आपल्या मागण्यांसाठी यापूर्वी 3 जून रोजी विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव व विभागीय सहसंचालक, उच्चशिक्षण यांना निवेदन दिले होते. परंतु, अद्यापपर्यंत मागण्या मंजूर न झाल्याने 10 ते 12 जूनपर्यंत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. 13 ते 17 जूनपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात कार्यरत असताना काळ्या फिती लावून विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर निदर्शने केलीत.  या वेळी मागासवर्गीय कर्मचारी संघ व विद्यापीठ ऑफिसर्स फोरमचे पदाधिकारी सहभागी झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com