लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेवाची हत्या

लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेवाची हत्या

भंडारा: भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील येरली गावात लग्नाच्या आदल्या दिवशीच नवरदेवाची हत्या केल्याची घटना घडली आहे. विनोद कुंभरे या 26 वर्षीय तरुणाचा लग्नाच्या आदल्या दिवशी मृतदेह मिळाल्याने गावात खळबळ उडाली असून त्याच्या मृतदेहाजावळ चाकू मिळाल्याने या तरुणाची हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

येरली येथील विनोद कुंभरे हा चंद्रपूर जिल्ह्यात एका खाजगी कंपनीत कामाला होता. उद्या त्याचे आणि त्याच्या भावाचा लग्न असल्याने तो सुट्ट्यांवर गावी आला होता काल (ता.04) काही कामानिमित्त घराबाहेर गेल्यावर तो परातलाच नाही. आज (ता.05) सकाळी गावशेजारील जंगलात त्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

विनोदच्या पोटावर एक मोठा घाव करण्यात आला असून शरीराजवळ एक चाकू ठेवला होता. त्यामुळे त्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली असल्याचा सांगण्यात येत आहे. मात्र, चाकू वर रक्ताचे डाग दिसत नसल्याने हत्येचे ठिकाण दुसरे असावे असा अंदाज बांधण्यात येत आहे. आदिवासी कुटुंबातील विनोद यांच्या वडिलांचा मृत्यू झाला असून तीन भाऊ आणि बहीण असे त्याचे कुटुंब आहे, मोलमजुरी करून कुटुंब चालविणाऱ्या विनोदचा लग्नाच्या आदल्या दिवशी खून का करण्यात आला असेल याची चर्चा सध्या परिसरात होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटना स्थळी दाखल झाले असून विनोदचे मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आले आहे. तुमसर पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com