Accident News : अज्ञात वाहनाने मेंढ्यांच्या कळपाला चिरडले ; रस्त्यावर पडला रक्ताचा सडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

unknown vehicle crushed flock of sheep 12 sheep killed on spot 4 seriously injured

Accident News : अज्ञात वाहनाने मेंढ्यांच्या कळपाला चिरडले ; रस्त्यावर पडला रक्ताचा सडा

धामणगाव रेल्वे (अमरावती) - तालुक्यातील यवतमाळ- धामणगाव राज्यमार्गावर जळका पटाचे फाट्याजवळ अज्ञात वाहनाने मेंढ्यांच्या कळपाला जोरदार धडक दिली.यात १२ मेंढ्या घटनास्थळीच ठार झाल्या असून ४ मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

दरम्यान रस्त्यावर रक्ताचा सडा पडला आहे.धडक देणारे वाहन घटनास्थळावरून पसार झाले.सदर घटना गुरुवारला (ता.१९) सायंकाली सातच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार असे की,यवतमाळ- धामणगाव राज्यमार्गावर जळका पटाचे फाट्याजवळ फाट्याजवळ रस्ता ओलांडत असलेल्या मेंढ्यांच्या कळपाल अचानक एका मोठ्यां चारचाकी वाहनाने धडक दिली.

या धडकेत १२ मेंढ्या जागीच दगावल्या तर ४ मेंढ्या गंभीर जखमी झाल्या.तळेगाव दशासर येथील मेंढपाळ कमलाकर शिंदे यांनी जळका पटाचे शेतशिवारात एका शेतात मेंढ्याचा कळप बसविला होता.रात्रीच्या वेळी आपल्या पालावर एका शेतातून दुसर्या शेतात जाण्यासाठी रस्ता ओलांडतांना मेंढ्यांच्या कळपाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.

यात मेंढपाळ कमलाकर शिंदे यांच्या तक्रारीवरून तळेगाव दशासर पोलिसांनी कारवाई सुरू केली असून घटनास्थळाचा.पंचनामा पोलिसांनी केली.दरम्यान सदरचा ट्रक आयशर कंपनीचा असावा असा प्राथमिक अंदाज तळेगाव दशासर पोलिसांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Amravatividarbhaaccident