अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक सामूहिक अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

अमरावती : फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील वडाळी येथील अल्पवयीन मुलावर (वय 13) त्याच परिसरात राहणाऱ्या पाच माथेफिरूंनी आळीपाळीने अनैसर्गिक सामूहिक अत्याचार केला. प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी गुरुवारी (ता. 22) पाच युवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

अनैसर्गिक सामूहिक अत्याचारप्रकरणी पाच मुलांविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. एप्रिल 2019 ते 14 ऑगस्ट 2019 पर्यंत पीडित अल्पवयीन मुलावर (वय 13) सामूहिक अत्याचार सुरू होता. पीडित मुलगा (वय 13) हा शाळेला सुटी झाल्यावर घरीच राहत होता. त्याला खेळण्याच्या बहाण्याने पाचही मुले वडाळी तलावाच्या काठी निर्जनस्थळी नेऊन अनैसर्गिक अत्याचार करीत होते. पीडित मुलाच्या सोबत राहणाऱ्या त्याच्या काही मित्रांवरही माथेफिरू युवकांचा डोळा होता. पीडित अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांनाही अत्याचार करणाऱ्यांनी, जिवे मारण्याची धमकी दिली. अत्याचाराचा प्रकार वाढत गेल्यामुळे पीडित मुलाने आपल्या पालकांजवळ या घटनेची माहिती दिली. पालकांनी पीडित मुलासह फ्रेजरपुरा ठाणे गाठून, पाचही जणांविरुद्ध आज (ता. 22) गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर कुणालाही अटक झाली नसल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unnatural mass abuse on a minor

टॅग्स