विनापरवाना औषध विक्रीचे प्रकरण संचालकांकडे 

विनापरवाना औषध विक्रीचे प्रकरण संचालकांकडे 

नागपूर - विनापरवाना औषधांची विक्री करणाऱ्या डॉक्‍टरला अन्न व औषध प्रशासनाच्या चमूने सोमवारी भद्रावती येथे पकडले व 12 हजारांचा साठा जप्त केला. संबंधित डॉक्‍टर मेडिकलच्या मानसोपचार विभागाचे प्रमुख आहेत. कारवाईचे अधिकार नसल्याने अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी प्रकरणाची माहिती मुंबईचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांच्याकडे सादर केली. संचालकांकडून आदेश आल्यानंतर पुढील कारवाई होईल. 

डॉ. प्रशांत टिपले यांचे चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे "ईशा माईंड केअर' नावाचे क्‍लिनिक आहे. रविवारी व सुटीच्या दिवशी ते खासगी क्‍लिनिक चालवितात. डॉ. टिपले विनापरवाना रुग्णांना औषधांची विक्री करीत असल्याची तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) करण्यात आली होती. रविवारी रुग्णाची तपासणी करून क्‍लिनिकमधील औषधांची विक्री करीत असताना अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने डॉ. टिपले यांना पकडले. त्यांच्याकडे असलेल्या मनोविकाराच्या औषधी सील केल्या. सोबतच 11 बिलबुक जप्त केले. पकडलेल्या औषधांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले आहे. नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे एफडीएचे म्हणणे आहे. 

खासगी प्रॅक्‍टिस करूनही घेतात एमपीए 
शासकीय डॉक्‍टरांना शासकीय वेळेत खासगीत सेवा देता येत नाही. मात्र, सरकारी सेवेनंतर उर्वरित वेळेत खासगी प्रॅक्‍टिस करण्यास सरकारने मुभा दिली आहे. मात्र, खासगी सेवा देणाऱ्या डॉक्‍टरांना व्यवसायरोध भत्ता (एनपीए) घेता येत नाही. मात्र, डॉ. प्रशांत टिपले हे एनपीए घेत असल्याची चर्चा मेडिकल वर्तुळात होती. यामुळे ते अडचणीत येणार असल्याचीही चर्चा होती. वर्षभरापूर्वी मेडिकल व मेयोतील काही खासगी प्रॅक्‍टिस करणाऱ्या डॉक्‍टरांचे प्रकरण चांगलेच गाजले होते. पहिल्या टप्प्यात नऊ तर दुसऱ्या टप्प्यात 28 डॉक्‍टरांना वैद्यकीय सचिव संजय देशमख यांनी नोटीसही दिल्या होत्या, हे विशेष.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com