वसतिगृहात अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

file photo
file photo

अमरावती : धामणगावरेल्वे तालुक्‍यातील एका गावातील शिक्षण संस्थेच्या वसतिगृहात राहणाऱ्या अल्पवयीन मुलावर (वय 12) तेथीलच एका अल्पवयीन मुलाने (वय 16) अनैसर्गिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना रविवारी (ता. 14) उघडकीस आली.
पीडित मुलाच्या पित्याने दत्तापूर पोलिसात तक्रार केल्यानंतर रविवारी याप्रकरणी अल्पवयीन मुलासह वसतिगृहाच्या महिला समन्वयिकेविरुद्ध गुन्हा दाखल झाला. गंभीर प्रकाराची दखल शाळा प्रशासनाने तातडीने न घेता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. शाळा आणि वसतिगृहाची विस्तीर्ण इमारत एकाच परिसरात आहे. अमरावतीसह बाहेर जिल्ह्यातील शेकडो मुले येथे शिकायला आहेत. वसतिगृहात राहणाऱ्या मुलांवर लक्ष्य ठेवण्यासाठी एका महिला समन्वयिकेची नेमणूक करण्यात आली आहे. गुरुवारी (ता. 11) सायंकाळी साडेचारच्या सुमारास याच वसतिगृहात राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने (वय 16) तेथील 12 वर्षीय मुलावर अत्याचार केला. पीडित मुलाने या घटनेसंदर्भातील माहिती तत्काळ वसतिगृहातील महिला समन्वयिकेसह शिक्षकांना दिली. शाळा प्रशासनाने अत्याचार करणाऱ्या मुलास बोलावून समज दिली. परंतु स्वत:हून या घटनेची तक्रार पोलिसात नोंदवली नाही. पीडित मुलाचे वडील रविवारी (ता. 14) सुटी असल्याने भेटीसाठी वसतिगृहात पोहोचले. तेव्हा पीडित मुलाने त्याच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती वडिलांना दिली. वडिलांनी वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. घटनेची तक्रार दत्तापूर पोलिसात नोंदविल्यानंतर अत्याचार करणाऱ्या मुलासह हा गंभीर प्रकार दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या वसतिगृहाच्या महिला समन्वयिका अशा दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल होताच दोघेही पसार
विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचाराच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी अत्याचार करणारा अल्पवयीन किंवा महिला समन्वयिका दोघेही तेथे आढळले नाहीत, असे दत्तापूरचे पोलिस निरीक्षक रवींद्र सोनवणे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com