ऊर्ध्व वर्धा धरण भरले 70 टक्के

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

अमरावती : जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 78.7 टक्के पर्जन्यमान झालेले असून अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारे ऊर्ध्व वर्धा धरण 69.42 टक्के भरले. पर्जन्यमानाची स्थिती कायम राहिल्यास पुढील आठवड्यात ऊर्ध्व वर्धा धरणाची दारे उघडली जाण्याची शक्‍यता आहे.

जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 814.5 मिलीमीटर आहे. 30 ऑगस्टपर्यंत 635.2 मिलीमीटर पर्जन्यमान अपेक्षित असते. प्रत्यक्षात यावर्षी 30 ऑगस्टपर्यंत 640.9 मिलीमीटर पर्जन्यमान झालेले आहे. आतापर्यंतच्या पर्जन्यमानाची टक्केवारी 100.9 टक्के आहे. 5 सप्टेंबरपर्यंत विदर्भात पावसाचा मुक्काम राहण्याचा अंदाज असल्याने उर्वरित दिवसांमध्ये पर्जन्यमानात आणखी भर पडण्याची निश्‍चिती आहे.
अमरावती शहरासह इतर गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वर्धा धरणाची जलसाठा क्षमता 564 दशलक्ष घनमीटर आहे. याप्रकल्पात शुक्रवारी (ता.30) सायंकाळपर्यंत 391.57 दशलक्ष घनमीटर (69.42 टक्के) जलसाठा आहे. याच तारखेला गतवर्षी या प्रकल्पात 266.89 दशलक्ष घनमीटर (47.32 टक्के) जलसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जलसाठ्यात आतापर्यंत 22.10 टक्के वाढ झालेली आहे. धरण शंभर टक्के भरल्यास किंवा पाणलोट क्षेत्रातून पाण्याचा झपाट्याने येवा कायम राहिल्यास पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जातो.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: urdhwa wardha dam 70 percent full