ऐकावे ते नवलच! लैंगिक क्षमता वाढविण्यासाठी "ड्रग्ज'चा वापर! 

अनिल कांबळे 
Friday, 29 November 2019

  • विवाहितांमध्ये वाढले प्रमाण 
  • कॉलेजवयीन युवक-युवतींमध्ये "क्रेझ' 
  • ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी "पॅडलर' शहरात 
  • उच्चभ्रू आणि व्यापारी वर्गाच्या वस्तींमध्ये वापर 

नागपूर : व्यसन कोणत्याही प्रकारचा असो, आरोग्यासाठी हाणीकारकच असतो. व्यसनामुळे व्यसन करणाऱ्या व्यक्‍तीसह कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. यामुळेच व्यसनाच्या आहारी जाऊ नका असे आवाहन नेहमी केले जाते. विदर्भातील वर्धा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली आहे. तंबाखूजन्य पदार्थांवर बंदीही आहे. आता मात्र लैंगिक क्षमता वाढविण्यासाठी उपराजधानीत अमली पदार्थांच्या सेवनाचा वापर वाढला आहे. ड्रग्ज सेवनामध्ये आता विवाहित पुरुषांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. तसेच महाविद्यालयीन युवक आणि युवतींनाही ड्रग्जचा मोठा "चस्का' लागला आहे. 

Image may contain: one or more people and people eating

मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरानंतर आता उपराजधानीत युवक आणि युवतींना "एंजॉय' करण्यासाठी पब आणि म्युझिक हाउस शहरात अनेक ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. तरुण आणि तरुणी नाकातून "ड्रग्ज' ओढत आणि सिगारेटचे झुरके घेत डान्स फ्लोअरवर थिरकतात.

जाणून घ्या - राज्यातील पहिले "स्मार्ट पोलिस ठाणे' कुठे आहे रे भौ?

विद्यार्थ्यांना ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी काही "पॅडलर' शहरात आहेत. युवा वर्गासोबतच आता ड्रग्ज सेवनाकडे विवाहित पुरुष आणि महिलाही ओढल्या जाऊ लागल्या आहेत. विशेषतः उच्चभ्रू आणि व्यापारी वर्गाच्या वस्तींमध्ये ड्रग्जचा (एमडी, हेरॉईन आणि ब्राऊन शुगर) वापर वाढल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. 

No photo description available.

विवाहित व्यक्‍ती आपली लैंगिक क्षमता वाढविण्यासाठी ड्रग्जचा वापर करीत आहेत. धक्‍कादायक म्हणजे विवाहित महिलासुद्धा ड्रग्जचे बिनधास्त सेवन करीत आहेत. शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यापूर्वी विवाहित महिला व पुरुष ड्रग्जचा डोज घेण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे ड्रग्जची विक्री आता तरुण-तरुणींप्रमाणेच विवाहित जोडप्यांमध्येही वाढली असल्याची माहिती एका पॅडलरने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. अनेक तरुण-तरुणी लैंगिक क्षमता वाढविण्यासाठी एमडी ड्रग्जसह डॉक्‍टरांच्या सल्ला न घेता औषध दुकांनातून विविध प्रकारच्या पॉवर टॅबलेट, कॅप्सूल आणि वेगवेगळ्या पावडरचाही वापर करीत आहेत. 

No photo description available.

शहरातील अड्डे

शहरातील काही ठराविक ठिकाणीच ड्रग्ज विक्री करण्यात येते. यामध्ये प्रामुख्याने मेडिकल-इंजिनिअरिंग कॉलेजजवळील परिसर, पब आणि मोठमोठी हॉटेल्स असलेल्या परिसराचा समावेश आहे. तर ताजबाग, एमआयडीसी, पाचपावली, जरीपटका, फुटाळा, मोमिनपुरा, खामला, गिट्टीखदान, कोतवाली, नंदनवन आणि सीताबर्डी या परिसरात पॅडलरचे ठरलेल्या ठिकाणी अड्डे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Image may contain: 1 person, suit
प्रा. राजा आकाश

शरीरासाठी अत्यंत धोकादायक 
ऍडक्‍टिव्ह ड्रग्ज आणि सायकोट्रॉफिक ड्रग्ज असे दोन प्रकारचे ड्रग्ज असतात. मात्र, ते योग्य डॉक्‍टरांचा सल्ला घेतल्यानंतर घ्यायला हवे. अन्यथा ते शरीरात गेल्यावर व्यसन जडते. काही मिनिटाच्या आनंदासाठी अमली पदार्थाचे सेवन करू नका. ते शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहे. डोज चुकला किंवा जास्त झाल्यास जीवालाही धोकादायक आहेत. लैंगिक क्षमता कमी आहे, असे वाटत असल्यास डॉक्‍टरांना भेटावे. 
- प्रा. राजा आकाश, मानसोपचारतज्ज्ञ


डॉ. चैतन्य शेंबेकर

नपुंसकत्व, गर्भधारणेसंदर्भातील अचडणी 
लैंगिक क्षमता वाढविण्यासाठी किंवा चस्का म्हणून ड्रग्ज घेणाऱ्यामध्ये शाळकरी मुलींसह महाविद्यालयीन विद्यार्थिनींचाही समावेश आहे. वयाच्या 15 ते 25 या वयोगटातील मुली ड्रग्ज घेतल्यामुळे त्यांना लग्न झाल्यानंतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मुलांमध्ये नपुंसकत्व तर मुलींना गर्भधारणेसंदर्भातील अचडणींना सामोरे जावे लागते. ड्रग्जचा निश्‍चितच वाईट परिणाम शरीरावर होतो. 
- डॉ. चैतन्य शेंबेकर, स्त्रीरोगतज्ज्ञ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Use of drugs to enhance sexual ability