'हनी देगा मनी' 

प्रशांत रॉय
Tuesday, 3 December 2019

साखरेला पर्याय शोधावा असा अनेक दिवसांपासून विचार होत आहे. आता त्याचे उत्तर जवळपास मिळाले असून मधापासून हनी क्‍लूब्ज तयार करून त्या वापरल्या तर हनी कमी आणि चहा पिण्याचा आनंद या दोन्ही बाबी शक्‍य होणार आहेत. 

नागपूर : 
रिश्‍तों की चाय में 
शक्कर जरा माप के ही रखना 
फीकी हुई तो स्वाद नहीं आएगा 
ज्यादा मीठी हुई तो मन भर जाएगा 

नातेसंबंधांसह चहामध्येही साखरेचे प्रमाण कमी-जास्त झाले तर काय परिणाम होतो, हे दर्शविणाऱ्या या ओळी. प्रत्यक्षात साखर म्हटलं की अनेकांच्या पोटात आजकाल धस्सं होतं. नाइलाजाने बिनासाखरेचा चहा प्यावा लागतो. गोडी न बदलता, रासायनिक घटक न वापरता साखरच बदलून चहामध्ये पर्यायी पदार्थ वापरला तर काय मज्जा येईल. हा पदार्थ म्हणजे हनी क्‍युब (मधाचे लहान तुकडे). साखरेमुळे वाढत चाललेल्या आरोग्याच्या कुरबुरी आणि जाणीवजागृतीमुळे हनी क्‍युबच्या माध्यमातून युवक, मधुमक्षिकापालक आणि शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळविता येणे शक्‍य होणार आहे, विशेष म्हणजे डिजिटल युगात हनी क्‍युबची इ-कॉमर्सद्वारे विक्री करता येणार असून "हनी देगा मनी' प्रत्यक्षात येण्याची शक्‍यता आहे. 

No photo description available.

वेगवान तंत्रज्ञानाच्या युगात ताणतणाव, बैठे काम आणि पोषक आहाराअभावी माणसाच्या शरीरातील साखरेचे संतुलन बिघडत चालले आहे. एका अभ्यासानुसार भारतात डायबिटीसमुळे दरवर्षी एक दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. 2035 पर्यंत देशात 109 दशलक्ष नागरिक या रोगामुळे बाधित होण्याचा अंदाज आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता साखरेपासून बचाव करण्याचे विविध प्रयत्न होत आहेत.

विशेष बातमी  - फास्टॅगमुळे स्थानिकांची होणार गोची

देशभरात चहा पिणारा शौकीन वर्ग मोठा आहे. किंबहुना तो आपल्या आदरातिथ्याचा, संस्कृतीचा एक महत्वपूर्ण भाग झाला आहे. या मोठ्या संख्येला चहापासून परावृत्त करणे अवघड आहे. त्यापेक्षा साखरेला पर्याय शोधावा असा अनेक दिवसांपासून विचार होत आहे. आता त्याचे उत्तर जवळपास मिळाले असून मधापासून हनी क्‍लूब्ज तयार करून त्या वापरल्या तर हनी कमी आणि चहा पिण्याचा आनंद या दोन्ही बाबी शक्‍य होणार आहेत. 

क्या बात है! - मिहानमध्ये चला जंगल सफारीला, वाघोबा परतले

भारत सरकारच्या खादी ग्रामोद्योग आयोगानेही मधाचे क्‍यूब्स बनवण्याचे काम सुरू केले आहे. 2020 मध्ये हनी क्‍यूब्स बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. यासाठी "भारत क्राफ्ट' नावाचे नवीन ई-कॉमर्स पोर्टल सुरू केले जाणार असून, त्याद्वारे विविध उत्पादनांची खरेदी विक्री केली जाणार असल्याचे संकेत आहेत. 

No photo description available.

आरोग्यदायी पर्याय

  • साखरेच्या तुकड्यांऐवजी चहामध्ये मधु क्‍यूब्स 
  • मधाचे उत्पादन वाढेल, उत्पन्नातही वाढ 
  • आदिवासींसह मधुमक्षिकापालकांना लाभदायक 
  • शेतकरी, युवक व बेरोजगारांसाठी फायद्याचे 

 

जाणून घ्या - तीन बायकांच्या दादल्याची अजबगजब कहानी वाचली का?

'भारत क्राफ्ट' ई कॉमर्स पोर्टल

केंद्रीय सूक्ष्म, लघु और मध्यम उद्योग मंत्रालयाद्वारे लवकरच "भारत क्राफ्ट' नावाने ई कॉमर्स पोर्टल सुरू केले जाणार आहे. यासंदर्भात एसबीआयसोबतही चर्चा सुरू आहे. या पोर्टलद्वारे उत्पादित वस्तूंची विक्री केली जाणार आहे. मधाचे सेवन हानिकारक नाही. अँटीऑक्‍सिडंट्‌स, "क' जीवनसत्त्व, खनिजे, अमीनो ऍसिडस्‌ आणि काही एंझाइमने देखील मध परिणपूर्ण आहे. मधात असलेले स्टार्की फायबर डेक्‍सट्रिनचे मिश्रण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास उपयुक्त आहे. मधामुळे मानवाची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. साखरेच्या तुलनेत मध पचायला हलका असून शरीरातील रोगजंतूही मरतात. 

Image may contain: 1 person
डॉ. शरद निंबाळकर

दुधात खडीसाखर 
साखरेऐवजी हमी क्‍युब्जचा वापर हा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम राहील याबाबत शंका नाही. मधुमेह असणाऱ्यांसाठी हनी क्‍युब्ज म्हणजे दुधात खडीसाखर आहे. कृषीक्षेत्रालाही याचा मोठा फायदा होणार आहे. कारण, मधमाशांमुळे परागीकरणाची प्रक्रिया होत असते. शेतकरी आणि युवकांनीही या व्यवसायातील भविष्यातील संधी ओळखून त्यादृष्टीने नियोजन करावे. 
- डॉ. शरद निंबाळकर, 
माजी कुलगुरू, डॉ. पंदेकृवि, अकोला

मोठे जाळे निर्माण होणार 
मधमाशीपालनासह मध विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांसाठी ही योजना महत्वपूर्ण ठरणार आहे. ऑनलाईन विक्रीमुळे मोठे जाळे निर्माण होणार आहे. याचा सर्वांनी लाभ घेतला पाहिजे. 
- सुधाकर रामटेके, मधुमक्षिकापालक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Use Honey Cube in Tea