विधानसभा निवडणुकीत नोटाचा वापर जास्त

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर: निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या उमेदवाराबाबत नापसंती दर्शविण्यासाठी निवडणूक आयोगाने नोटाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. नोटाला सर्वाधिक मत मिळाल्यानंतरही फेर निवडणुकीची तरतूद नाही. मतदानावर बहिष्कार घालण्यापेक्षा अनेक जण नोटा मत देणे पसंत करतात. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत लोकसभेपेक्षा जास्त मत नोटाला मिळाली.

मतदान करण्याचा अधिकार मतदारांचा आहे. कुणाला करायचे हे त्यांनीच ठरवायचं असते. निवडणुकीमध्ये उभे असलेले उमेदवार मतदारांना आवडणारचं असे नाही. अनेकांना उमेदवारांबाबत आक्षेपही असतात. एकही उमेदवार चांगला नाही, अशी ओरड करीत मतदान न करण्याचे समर्थन करतात. अशा वेळी नागरिक पर्याय म्हणून "नोटा'चा पर्याय आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. मागील लोकसभेपासून हा पर्याय मतदारांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नागपूर शहर लोकसभा मतदारसंघात एकूण मतदानापैकी केवळ 4 हजार 578 लोकांनीच नोटाचा वापर केला होता. तर रामटेक लोकसभा मतदासंघामध्ये 7 हजार 13 लोकांनी नोटाला पसंती दिली. मात्र, यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये नोटाच्या संख्येत वाढ झाली आहे. शहरातील सहा विधानसभा मतदारसंघात तीनपटीने तर रामटेक लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास दुपटीने वाढल्याचे चित्र आहे.

शहरातील सहाही मतदारसंघांत 16711 तर ग्रामीण भागातील सहाही मतदारसंघांत एकूण 11767 मतदारांनी नोटाला पसंती दिली.
नोटाचा वाढता वापर हा आता राजकीय पक्षांपुढे एक आव्हान ठाकल्याचे दिसून येत आहे. वर्ष 2019 च्या लोकसभा निवडणुकीत व नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जिल्ह्याच्या बाराही मतदारसंघांमध्ये हा नोटाचा वापर वाढला असल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नागपूर शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघांत यंदा एकूण 50.68 टक्के इतकेच मतदान झाले. तर ग्रामीण भागातील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये 64.51 टक्के इतके मतदान झाले. नागपूर शहरात एकूण 22 लाख 09 हजार 352 इतके मतदार आहेत. यापैकी 11 लाख 19 हजार 790 इतक्‍या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर ग्रामीण भागातील 6 मतदारसंघांत एकूण 19 लाख 62 हजार 069 इतके मतदार आहेत. यापैकी 11 लाख 57 हजार 027 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

जिल्ह्यातील विधानसभानिहाय नोटाची संख्या
मतदारसंघ नोटा
पश्‍चिम 3,717
दक्षिण 2,353
पूर्व 3,460
मध्य 2,149
उत्तर 1,986
दक्षिण-पश्‍चिम 3,046
कामठी 2,347
काटोल 2,004
सावनेर 1,819
हिंगणा 2,256
उमरेड 1,724
रामटेक 1,617

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com