शौचालयाचा वापर उठला जिवावर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

कामठी : आपल्या शौचालयाच्या वापर केल्याच्या वादातून धाकट्या भावाने थोरल्याचा खून केल्याची घटना कामठी येथील रमानगर भागात रविवारी सकाळी घडली. खुशाल ताराचंद बोरकर (वय 50) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी मृताचा सख्खा धाकटा भाऊ आरोपी सुरेश ताराचंद बोरकर (वय 45) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

कामठी : आपल्या शौचालयाच्या वापर केल्याच्या वादातून धाकट्या भावाने थोरल्याचा खून केल्याची घटना कामठी येथील रमानगर भागात रविवारी सकाळी घडली. खुशाल ताराचंद बोरकर (वय 50) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी मृताचा सख्खा धाकटा भाऊ आरोपी सुरेश ताराचंद बोरकर (वय 45) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोरकर भावंडं विवाहित असून रमानगर येथील चार स्वतंत्र खोलीच्या एका मोठ्या घरात अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. त्यातील दोन खोलीच्या घरात किरायदार राहतात तर भाऊ दोन वेगवेगळ्या खोलीत वास्तव्यास आहेत. त्यांचे स्वतंत्र शौचालय आहे. मात्र, या दोन भावांचे एकमेकाशी पटत नव्हते. त्यातच आज माझ्या शौचालयाचा वापर का केलास यावरून भावांमधील भांडण विकोपाला गेले. यामुळे संतापून रागाच्या भरात लहान भावाने मोठ्या भावाच्या छातीवर तीक्ष्ण अवजाराने सपासप वार करून घटनास्थळाहून पळ काढला. या घटनेची माहिती पसरताच बघ्यांनी एकच गर्दी केली. काही वेळातच शेजारील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत खुशाल याला शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ पाठविले. मात्र, तोवर त्याचा मृत्यू झाला होता. यावेळी डॉ. वाघमारे यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसानी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेहाचे कामठी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मृताची पत्नी सीमाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सुरेश बोरकर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. बातमी लिहिस्तोवर आरोपीस अटक करण्यात आली नव्हती.

राजाचे वडील हरवले
मृत खुशाल याला राजा नावाचा एकुलता एक बारा वर्षांचा मुलगा आहे. राजा गतिमंद आहे. राजावर खुशालचे खूप प्रेम होते. त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी तो धडपड करायचा. विशेष म्हणजे मुलगा राजा आणि वडील खुशाल मित्रासारखे राहायचे. मात्र, काकाने वडिलांचा घात केल्याने राजा पोरका झाला आहे. आईवर त्याची पूर्ण जबाबदारी आली आहे. यासोबतच सुरेशचेही कुटुंब अडचणीत आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The use of the toilet has come to life