उत्तमराव इंगळे आदिवासी विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जून 2019

यवतमाळ : उमरखेडचे माजी आमदार उत्तमराव इंगळे यांना शासनाने राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळावर त्यांची उपाध्यक्षपदी निवड केली आहे. नाशिक येथील आदिवासी विकास महामंडळावर उपाध्यक्षपदी उत्तमराव इंगळे यांची वर्णी लागली आहे. महामंडळाचे अध्यक्षपद आदिवासी विकासमंत्री, तर उपाध्यक्षपदी आदिवासी विकास राज्यमंत्री किंवा सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींना दिले जाते. उपाध्यक्षपदी उमरखेडचे माजी आमदार उत्तमराव राघोजी इंगळे यांची निवड केल्याचा अध्यादेश आज मंगळवारी शासनाने जारी केला.

यवतमाळ : उमरखेडचे माजी आमदार उत्तमराव इंगळे यांना शासनाने राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळावर त्यांची उपाध्यक्षपदी निवड केली आहे. नाशिक येथील आदिवासी विकास महामंडळावर उपाध्यक्षपदी उत्तमराव इंगळे यांची वर्णी लागली आहे. महामंडळाचे अध्यक्षपद आदिवासी विकासमंत्री, तर उपाध्यक्षपदी आदिवासी विकास राज्यमंत्री किंवा सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींना दिले जाते. उपाध्यक्षपदी उमरखेडचे माजी आमदार उत्तमराव राघोजी इंगळे यांची निवड केल्याचा अध्यादेश आज मंगळवारी शासनाने जारी केला. उपाध्यक्षांना राज्यमंत्री दर्जा असल्याने जिल्ह्यातील लालदिव्यांची संख्या नऊवर पोहोचली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uttamrao Ingale as Deputy Chairman of Tribal Development Corporation