व्ही. शांतारामांच्या चित्रपटातील "स्त्री' समस्या दर्शक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

नागपूर : व्ही. शांताराम यांनी कुंकू, शेजारी सारखे चित्रपट दिग्दर्शित केले. या चित्रपटामधील "स्त्री' पात्र त्या वेळच्या प्रश्‍नांचे प्रतिनिधित्व करतात, असे मत ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, सिनेअभ्यासक समर नखाते यांनी व्यक्त केले.

नागपूर : व्ही. शांताराम यांनी कुंकू, शेजारी सारखे चित्रपट दिग्दर्शित केले. या चित्रपटामधील "स्त्री' पात्र त्या वेळच्या प्रश्‍नांचे प्रतिनिधित्व करतात, असे मत ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, सिनेअभ्यासक समर नखाते यांनी व्यक्त केले.
सप्तक संस्था, ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशन, नागपूर महापालिका, पुणे फिल्म फाउंडेशनतर्फे चौथ्या ऑरेंज सीटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी ते दै. "सकाळ'च्या प्रतिनिधीशी बोलत होते. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये व्ही. शांताराम दिग्दर्शित शेजारी, कुंकू, नवरंग, दो आंखे बारह हाथ, झनक झनक पायल बाजे हे चित्रपट दाखविण्यात आले. चित्रपट पाहण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी गर्दी केली होती.
व्ही. शांताराम यांचे स्वातंत्र्यपूर्व काळातील हे चित्रपट आहेत. मात्र, आपण सामाजिक किंवा व्यक्तिगत पातळीवरील कुठल्या भावनांना कुठल्या पद्धतीने हाताळतो, हा प्रश्‍न आहे. त्यांची कला कारकीर्द खूप मोठी आहे. त्यांनी चित्रपट सृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात काम केले आहे. हे करीत असताना देशातील महत्त्वाच्या चित्रपट निर्मिती संस्थेशी (प्रभात) त्यांचे नाते होते. प्रभात संस्थेच्या कालखंडात निर्माण झालेले चित्रपट सामाजिक गगनाशयाचे आहेत. त्यामधील पैलू त्यावेळच्या समकालीन पण प्रश्‍न विचारण्याच्या धाटणीचे आहेत, असे समर नखाते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: V Shantaram's film depicts the problem of "woman"