पशुवैद्यकीय दवाखाना रामभरोसे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

भिवापूर (जि.नागपूर) : पशुवैद्यकीय दवाखाना (श्रेणी-1) 
येथील पशुधन पर्यवेक्षकाचा मृत्यू झाला. तेव्हापासून तब्बल दीड वर्ष पशुधन पर्यवेक्षकाचे पद रिक्त आहे. त्यामुळे अंतर्गत 15 गावांचा डोलारा पशुधन विकास अधिकारी आर. एम. ब्राम्हणकर यांनाच सांभाळावा लागत आहे. 

पशुधन पर्यवेक्षक सुरमवार यांचा 2017 मध्ये मृत्यू झाला. तेव्हापासून रिक्त असलेले पद भरण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. परिणामी ऑगष्ट महिना लागूनही पद रिक्त आहे. प्राप्त माहितीनुसार कुही पंचायत समितींतर्गत असणारे पशुधन पर्यवेक्षक खोब्रागडे यांची भिवापूर येथे बदलीची ऑर्डर जून महिन्यात निघाली. पावसाळा लागताच जनावरांना लसीकरण करावे लागते. वेळेवर लसीकरण होणे महत्त्वाचे असते. पशुवैद्यकीय दवाखाना (श्रेणी-1) भिवापूरअंतर्गत भिवापूरसह भागेबोरी, अड्याळ, चिखली, रोहणा, परसोडी, किन्ही (खुर्द), सावरगाव, नेरी, नक्षी, मांगली (जग), वळध, जांभुर्डा, डोंगरगाव व नागतरोली या 15 गावांचा डोलारा एकट्या पशुधन विकास अधिकारी यांना सांभाळावा लागत आहे. यात रिक्तपदामुळे चांगलीच तारेवरची कसरत करावी लागते. कुही पंचायत समितींतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना येथील अधिकाऱ्यांनी खोब्रागडे यांना न सोडल्यामुळे अजूनही पद रिक्त आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vacant seats in Veterinary Clinic