चामोर्शी, आरमोरी, अहेरीतही कोरोना लसीकरण; अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतला उपक्रमाचा लाभ

Vaccination started in Gadchiroli district also
Vaccination started in Gadchiroli district also

गडचिरोली : जागतिक महामारी ठरलेला कोरोनाला हरविणारी लस गडचिरोली आली असून लसीकरण मोहिमेला शनिवार (ता. 16) पासून सुरुवात झाली. दरम्यान गडचिरोलीसह चामोर्शी, आरमोरी, अहेरी या तालुक्‍यांतही या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला.

चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण लायबर, वैद्यकीय अधिकारी डॉ. शेषराव भैसारे, डॉ. शिवराम कुमरे, डॉ. शेखर दोरखंडे, डॉ. गेडाम, डॉ. शिल्पा गेडाम, डॉ. शिल्पा गभने, अधिपरीचारिका ज्योती पोगुलवार, शुभांगी गडकर, व्हॅक्‍सिनेशन ऑपरेटर ताराचंद वेलादी, प्रोग्राम मॅनेजर कांचन कुळमेथे, डाटा ऑपरेटर चंद्रकांत गव्हारे व लसीकरण कार्यक्रम संनियंत्रक गोविंदा कडस्कर आदी उपस्थित होते. 

भारत सरकारने सर्वांत जास्त जोखीम असलेल्या आरोग्य कर्मचारी यांना लसीकरणात प्राधान्य दिले असून त्यानुसार पहिल्या टप्प्यात चार केंद्रांवर प्रत्येकी 100 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली. यावेळी रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात कोवीड लसीकरणाचा प्रारंभ उपविभागीय अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला. पहिल्या टप्प्यात उपजिल्हा रुग्णालयातील 107 कर्मचाऱ्यांची निवड झाली. 

यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय उमाटे, डॉ. नीतेश नाकाट, डॉ. चेतन इंगोले, अधिपरिचारीका फ्लॉरेन्स नेहेम्या, प्रेरणा झाडे, सावित्री मडावी, असीमा सरदार, वनश्री होयामी, वैशाली कुळसंगे, आदी उपस्थित होते. आरमोरी येथेही आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.

काळजी घेण्याचे आवाहन...

लसीकरण मोहीम सुरू असली तरी प्रत्येकाने त्यांचे लसीकरण होईपर्यंत काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी यांनी केले आहे. लसीकरण ऐच्छिक असले तरी बहुतांश कर्मचारी लस घेण्यास उत्सुक आहेत. लसीकरणानंतर लस घेतलेल्या व्यक्तीवर देखरेखीसाठी वातानुकूलित कक्ष तयार आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी लस घेतली त्यांच्यावर कुठलेच दुष्परीणाम आढळले नाही. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनंतर पुढील टप्प्यात प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लस मिळेल. पुढे टप्प्या-टप्प्याने सफाई कर्मचाऱ्यांसह सर्वच फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार असल्याची माहीती वैद्यकीय अधीक्षक डॉ. मडावी यांनी दिली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com