अभिमानास्पद! वैशाली सोमकुंवर यांनी उंचावली नागपूरची मान

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 December 2019

वैशाली सोमकुंवर-माने यांनी "मिसेस सिंगापूर युनिव्हर्सल ब्यूटी-2019' आणि "मिसेस सिंगापूर एलेगन्स-2019' हे दोन किताब पटकावून नागपूरची मान उंच केली आहे. सिंगापूर येथे झालेल्या स्पर्धेत विविध देशातील शेकडो महिलांनी सहभाग नोंदवला होता.

नागपूर : वैशाली सोमकुंवर-माने या मुळच्या नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्‍यातील रहिवासी... त्यांचे शिक्षण मुंबईतच झाले. शिक्षण पूर्ण केल्यांनतर त्यांनी पुढील वाटचालीसाठी 2016 साली सिंगापूर गाठले. यानंतर त्यांनी त्या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला व "मिसेस सिंगापूर युनिव्हर्सल ब्युटी-2019' आणि "मिसेस सिंगापूर एलेगन्स-2019'चा पुरस्कार पटकाविला आहे. विशेष म्हणजे, भारतातर्फे त्या एकमेव स्पर्धक होत्या. त्यांनी दोन किताब पटकावून नागपूरची मान उंच केली आहे. 

हेही वाचा - video : थॅंक्‍यू हैदराबाद पोलिस, वुई सॅल्यूट यू! 

वैशाली या नागपूरच्या भय्यासाहेब सोमकुंवर यांच्या कन्या आहेत. मुंबई येथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी 2016 साली सिंगापूर गाठले. त्या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतला. अंतिम पाच स्पर्धकांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. यावेळी अंतिम फेरीसाठी त्यांची निवड झाली. त्यांच्यासह चीन, मलेशिया येथून सिंगापूरला स्थायिक झालेल्या महिला स्पर्धक होत्या. केवळ दोनच महिला एकावेळी दोन टायटल मिळविण्यात यशस्वी झाल्या असून, त्यामध्ये एक वैशाली आहेत. 

कसं काय? - हैदराबाद घटनेची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचार करून हत्या

वैशाली सोमकुंवर-माने यांनी "मिसेस सिंगापूर युनिव्हर्सल ब्यूटी-2019' आणि "मिसेस सिंगापूर एलेगन्स-2019' हे दोन किताब पटकावून नागपूरची मान उंच केली आहे. सिंगापूर येथे झालेल्या स्पर्धेत विविध देशातील शेकडो महिलांनी सहभाग नोंदवला होता. त्यातून अंतिम फेरीसाठी वैशाली सोमकुंवर यांची निवड झाली होती. अंतिम पाचमध्ये पोहोचलेल्या चीन, मलेशिया आदी देशातून नागपूरच्या वैशाली या एकमेव भारतीय महिला होत्या. 

दिलासा - महिलानो, घाबरू नका संकटसमयी करा कॉल

 

माझ्यासाठी आनंदाची बाबा 
सिंगापूरमध्ये आल्यानंतर तीनच वर्षांत मला हा किताब मिळाला आहे. ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची बाबा आहे. 
- वैशाली सोमकुंवर-माने, 
"मिसेस सिंगापूर युनिव्हर्सल' पुरस्कार विजेत्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vaishali Somkuwar raised the honor of Nagpur