Loksabha 2019 : बच्चू कडूंकडून अमरावतीतून शेतकरी विधवेला संधी

Loksabha 2019 : बच्चू कडूंकडून अमरावतीतून शेतकरी विधवेला संधी

यवतमाळ : यवतमाळ- वाशीम लोकसभा मतदारसंघातून प्रहार जनशक्ती पक्षाकडून
शेतकरी विधवा व ९२ व्या अ. भा. मराठी साहित्य सम्मेलनाच्या उदघाटक वैशाली येडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा पक्षप्रमुख आमदार बच्चू कडू यांनी आज (गुरुवारी) केली.

अमरावती येथे वैशाली येडे यांच्या उमेदवारीसंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात आला. 
वैशाली सुधाकर येडे (रा. राजूर , ता. कळंब) या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील असून त्यांच्या पतीने सततची नापिकी व कर्जास कंटाळून ७ वर्षांपूर्वी आपली जीवनयात्रा संपवली होती. दुःखावर मात करत दोन मुलांचा सांभाळ करणाऱ्या वैशाली येडे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या व्यथा मांडण्याचे काम केले आहे.

यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य सनमेलनाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले होते. अमरावती येथे लोकसभेच्या उमेदवार म्हणून जाहीर केल्यावर वैशाली येडे
यांचे स्वागत पक्षप्रमुख आमदार बच्चू कडू ,डॉ. प्रा. नयनाताई कडू यांनी केले. 'प्रहार'चे कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ, राज्य संपर्कप्रमुख प्रमोद कुदळे, जिल्हाप्रमुख नितीन मिर्झापुरे, जिल्हाप्रमुख विलास पवार, अमरावती जिल्हाप्रमुख वसू महाराज, जिल्हाप्रमुख बिपीन चौधरी, जिल्हासंपर्क प्रमुख आशिष तुपटकर, विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख रवी राऊत, रूपेश सरडे, प्रशांत आवारे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com