वैष्णवी, भक्‍तीला धनादेश प्रदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

विश्‍व विद्यापिठ बॅडमिंटन स्‍पर्धेत केले होते भारताचे प्रतिनिधित्‍व

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाच्या प्रभारी संचालकपदी नुकत्याच रुजू झालेल्या डॉ. कल्पना जाधव यांनी ‘पेंडिंग’ कामे करण्याचा धडाका सुरू केला आहे. डॉ. जाधव यांनी सहा महिन्यांपासून धनादेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या महिला बॅडमिंटनपटूंना त्यांचा धनादेश सुपूर्द करून दिलासा दिला. 

शारीरिक शिक्षण विभागात गुरुवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित छोटेखानी समारंभात डॉ. जाधव यांनी वैष्णवी भाले, भक्‍ती दहासहस्त्र आणि खुशबू पटेल यांना प्रत्येकी एक लाख आठ हजारांचा धनादेश प्रदान केला. याप्रसंगी एलएडी महाविद्यालयाच्या क्रीडाविभाग प्रमुख दुर्गेशनंदिनी तितरमारे, डॉ. नीता कश्‍यप व डॉ. साधना देशमुख उपस्थित होत्या. 

एलएडीच्या या महिला बॅडमिंटनपटूंनी गेल्या सप्टेंबरमध्ये रेमेनस्कोई (रशिया) येथे झालेल्या विश्‍व आंतरविद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व केले होते. स्पर्धेत भारतीय विद्यापीठ संघ अकराव्या स्थानावर राहिला होता. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना विद्यापीठातर्फे प्रवास, किट, ब्लेझरसाठी पैसे देण्यात येते. स्पर्धेसाठी तिघींनाही स्वत:च खर्च करावा लागला. सहा महिन्यांनंतर का होईना विद्यापीठाने त्यांना पैसे देऊन आपली जबाबदारी पूर्ण केली.

Web Title: vaishnavi bhakti demand draft