जवाहरकुंडात बुडून वलगावच्या पर्यटकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

चिखलदरा (जि. अमरावती) ः तालुक्‍यात सेमाडोह येथील सिपना नदी पात्रातील जवाहरकुंडात बुडून वलगाव येथील पर्यटकाचा मृत्यू झाला. रविवारी (ता. आठ) सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. सतीश ओंकार निर्मळ (वय 40, रा. वलगाव), असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

चिखलदरा (जि. अमरावती) ः तालुक्‍यात सेमाडोह येथील सिपना नदी पात्रातील जवाहरकुंडात बुडून वलगाव येथील पर्यटकाचा मृत्यू झाला. रविवारी (ता. आठ) सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. सतीश ओंकार निर्मळ (वय 40, रा. वलगाव), असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
सोमवारपर्यंत (ता. नऊ) स्थानिक नागरिकांसह जिल्हाधिकारी कार्यालयातील शोध व बचाव पथकाला पाचारण करण्यात आले होते. सायंकाळी अर्धा किलोमीटर अंतरावर नदीच्या काठी श्री. निर्मळ यांचा मृतदेह सापडला, असे चिखलदराचे पोलिस निरीक्षक आकाश शिंदे यांनी सांगितले. पावसाच्या दिवसांत नेहमीच चिखलदरा परिसरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. शनिवार, रविवारसह इतर शासकीय सुटीच्या दिवशी पर्यटकांची नेहमीच गर्दी होते. रविवारी (ता.आठ) देखील हजारो पर्यटक येथे आले होते. सतीश निर्मळसह पुरुषोत्तम तेलखेडे (वय 32 रा. जवाहरनगर), अंकित बापूराव ठाकरे (वय 29, रा. टोपेनगर) व भूषण जानराव सांगोळे (वय 29, रा. विदर्भ मिल कॉलनी, परतवाडा), असे चौघे रविवारी सुटी असल्यामुळे पर्यटनासाठी चिखलदरा येथे गेले होते. सायंकाळी साडेचारच्या सुमारास हे चारही मित्र सेमाडोह येथील जवाहरकुंड परिसरात आले. याठिकाणी त्यांनी मोबाईलने काही फोटो काढले. सतीशचा तोल जाऊन तो खोल कुंडात बुडाला. रविवारी सायंकाळपासून बेपत्ता सतीशला शोधण्याचे काम सुरू होते. त्यात सोमवारी सायंकाळी यश आले.
---
सेल्फीचा नाद जिवावर बेतला
चिखलदऱ्यात खोल दऱ्याखोऱ्या आहेत, जलाशयसुद्धा तुडुंब भरलेत. अशा ठिकाणी सेल्फी काढणे धोकादायक असतानादेखील काही उत्साही पर्यटक जीव धोक्‍यात घालून असे प्रयोग करतात. सेल्फीचा नाद अनेकांच्या जिवावर बेतू शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Valgaon tourist drowned in Jawaharkund