वंचितचा उमेदवार रुग्णालयात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

गडचिरोली : अहेरी विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी मिळालेले बहुजन वंचित आघाडीचे ऍड. लालसू नागोटी हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी (ता.1) सकाळी भामरागड तालुक्‍यातील कारमपल्ली गावालगत घडली. ते निवडणूक प्रचारासाठी गेले होते.

विधानसभा निवडणुकीचा ज्वर चढला असताना ऍड. लालसू नागोटी यांचा अपघात झाल्याने बहुजन वंचित आघाडीच्या नेत्यांपुढे समस्या निर्माण झाली आहे. नागोटी हे सकाळी भामरागड येथून मोटारसायकलने कारमपल्ली येथे जात असताना त्यांची मोटारसायकल घसरली. यात त्यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली असून भामरागड येथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. बहुजन वंचित आघाडीचे तिकीट मिळाल्यानंतर ऍड. नागोटी हे प्रचाराच्या कामाला लागले होते. मात्र, अपघाताच्या घटनेमुळे वंचितला मोठा धक्का बसला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vanchit candidate met with accident