वंदे मातरम्‌ स्फुर्तीगीत ः महापौर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

नागपूर ः वंदे मातरम्‌ प्रत्येक भारतीयांच्या मनात देशभक्ती जागविणारे स्फुर्तीगीत आहे. स्वातंत्र्यामागील बलीदानाचे महत्व कळावे, देशप्रेम ही भावना त्यांच्याही मनात तेवत राहावी, याउद्देशाने आयोजित वंदे मातरम्‌ समुहगान स्पर्धेमुळे संपूर्ण शहरात देशभक्तीपर वातावरणाची निर्मिती होते, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

ऑगस्ट क्रांती दिनाच्या औचित्याने झाशी राणी चौकातील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनच्या सभागृहामध्ये महापौरांनी महानगरपालिकेच्यावतीने आयोजित महापौर चषक वंदे मातरम्‌ समूहगान स्पर्धेचे उद्‌घाटन केले. यावेळी शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले, शिक्षण समिती उपसभापती प्रमोद तभाने, प्रभारी शिक्षणाधिकारी कुसुम चाफलेकर, क्रीडा अधिकारी नरेश सवाईथूल, स्पर्धेचे प्रशिक्षक आकांक्षा नगरकर, डॉ. रश्‍मी रायकर व भिमराव भोरे आदी उपस्थित होते. 14 ऑगस्टला सिव्हील लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे.
160 शाळांचा सहभाग
ही स्पर्धा तीन गटात आयोजित करण्यात आली आहे. पहिल्या गटात इयत्ता नववी ते दहावी, दुसऱ्या गटात इयत्ता सहावी ते आठवी व तिसऱ्या गटात इयत्ता पहिली ते पाचवी, अशा 160 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vande Mataram is inspiring song : Mayor