खासदार वरुण गांधीनी घेतली "प्रेमासाईं'ची भेट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

यवतमाळ : केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी यवतमाळात येऊन गांधी कुटुंबीयांचे आध्यात्मिक गुरू प्रेमासाई महाराज यांची चार दिवसांपूर्वी भेट घेतली होती. त्यामुळे प्रेमासाई महाराज रातोरात प्रकाशझोतात आले. त्यानंतर भाजपचे खासदार वरुण गांधी यांनीही बुधवारी (ता. 15) त्यांच्या निवासस्थानी भेट दिल्यामुळे पुन्हा प्रेमासाई महाराज यांच्याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. या भेटींमुळे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार म्हणून प्रेमासाई महाराज यांच्याकडे बघितले जाऊ लागले आहे.

प्रेमासाई महाराज केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्या भेटीमुळे प्रेमासाई महाराज प्रकाशझोतात आले होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, भाजप नेते खासदार वरुण गांधी यांनी बुधवारी (ता. 15) दुपारी दोन वाजता प्रेमासाई महाराज यांच्या निवासस्थानी भेट दिली. दोन तासांच्या या भेटीत खासदार गांधी व प्रेमासाई महाराज यांच्या चर्चेतील तपशील बाहेर आला नसला तरी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही चर्चा झाल्याची माहिती आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार हे निश्‍चित मानल्या जात आहे. शिवसेनेच्या ताब्यात असलेला यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अशातच राष्ट्रीयस्तरावरील दोन भाजप नेते एका पाठोपाठ एक जिल्ह्यात गोपनीय पद्धतीने येऊन गेल्याने राजकीय क्षेत्रात विविध चर्चांना उधाण आले आहे.

Web Title: varun gandhi meet premasai maharaj

टॅग्स