वसई व पालघर आरटीओचा प्रस्ताव विचाराधीन - रावते

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 डिसेंबर 2016

नागपूर - ठाणे जिल्ह्यातील वसई येथे व नवनिर्मित पालघर जिल्ह्याचे नवे उपप्रादेशिक परिवहन कार्यालये निर्माण करण्याचे प्रस्ताव विचाराधीन असल्याचे आश्‍वासन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी विधानसभेत दिले.

वसई येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करावे, यासंदर्भात क्षितीज ठाकूर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. ठाणे जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा व तलासरी हे तालुके आदिवासीबहुल असून, या तालुक्‍यांतून ठाणे येथे संपर्क साधणे कठीण जाते. या तालुक्‍यांमधील लोकांना वसई येथे जाणे सोईस्कर असल्याचे ठाकूर यांनी निदर्शनास आणून दिले. सुभाष पाटील यांनी पालघर नवा जिल्हा झाला आहे. यात आरटीओ कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी केली. या वेळी दोन्ही शहरांमध्ये आरटीओ कार्यालय सुरू करण्याच्या संदर्भात येणाऱ्या प्रस्तावावर निश्‍चितपणे गांभीर्याने विचार करण्यात येईल, असे आश्‍वासन रावते यांनी दिले.

Web Title: Vasai and Palghar RTO proposal under consideration