हटके! शालेय पोषण आहारात परसबागेतील भाजीपाला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

नागपूर : अंगणवाडीनंतर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना पोषण आहारात परसबागेतील भाजीपाला द्यावा, अशी सूचना सरकारने दिली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही परसबाग फुलणार आहे. परसबागेसाठी प्रत्येक शाळांना सरकारकडून पाच हजारांचे अनुदान दिले जाणार आहे. 

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत केंद्र सरकारने शाळांमध्ये परसबाग निर्माण करून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश पोषण आहारामध्ये करण्याबाबत सूचना केल्यात. नागपूर जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात सुमारे 1,531वर शाळा आहेत. प्रत्येक शाळेमध्ये थोड्या फार प्रमाणात मोकळी जागा आहे. शाळांना दररोजच्या शालेय पोषण आहारमध्ये (मध्यान्ह भोजन) पालेभाज्या व इतर भाजीपाल्यांची गरज भासत असते. जसे टमाटर, हिरवी मिरची, सांबार, कांदा आदी. हा भाजीपाला शाळा परिसरामध्ये तयार करावा. परसबागेत सेंद्रिय पद्धतीने पालेभाज्या पिकवल्या आणि त्याच भाज्या मुलांना शालेय पोषण आहारामध्ये दिल्या तर मुलेही मोठ्या चवीने ते घेतील. शिवाय विद्यार्थ्यांना "गार्डनिंग'ची आवड निर्माण होईल. पर्यावरणाचीही आवड त्यांना लागेल. तसेच शाळेच्या अवतीभोवती असलेल्या प्रदूषणावरही या माध्यमातून नियंत्रण ठेवण्यात यश प्राप्त होणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vegetables in the School Nutrition Diet