‘ॲप’ करणार वाहनांची ‘स्पीड कंट्रोल’

App
App

नागपूर - दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत आहे. भरधाव वाहनांमुळे त्यात अधिक भर पडते. तरुणाईच्या वेगाला आवरणे कठीण होत आहे. यावर जे. डी. अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयातील माहिती व तंत्रज्ञान शाखेतील अंतिम वर्षाच्या चार विद्यार्थ्यांनी दुचाकी आणि चारचाकीच्या वेगावर नियंत्रण आणणारे मोबाईल ॲप विकसित केले. 

शहरातील रस्त्यांवरून डावीकडे वा उजवीकडे टर्न घेताना किंवा स्पीडब्रेकर मध्येच आल्यास दुचाकी वा चारचाकी वाहनाची गती जास्त असल्यास अपघाताची शक्‍यता असते. 

अनेकदा अचानक कुणी समोर आल्यास चालकास वाहनावर नियंत्रण मिळविता येत नाही. विशेष म्हणजे शहरात भरधाव वेगाने वाहन धडकल्याने अपघात झाल्याच्या घटना दररोजच घडत आहेत. या अपघातात दगावणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी दुचाकी वा चारचाकीच्या वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. हाच विचार मनात ठेवून रूपेश शर्मा, स्नेहा वाकडे, रोशन पुंवात्कार आणि चंद्रशेखर राठोड या चौघांनी अँड्राईड मोबाईलवर सॉफ्टवेअर तयार केले. त्या माध्यमातून दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या वेगावर नियंत्रण  ठेवता येणे शक्‍य होणार आहे. यासाठी एक विशिष्ट डिवाईस तयार करून ते वाहनात लावल्यास वळण, दुभाजक आणि स्पीडब्रेकर आल्यास आपोआपच वाहनाचा वेग ताशी १४ किलोमीटर होईल. 

सामान्य वेगात हे सॉफ्टवेअर आपोआप बंद होईल. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने तयार करण्यात आलेला प्रकल्प अतिशय परिणामकारक ठरणारा आहे. विद्यार्थ्यांनी यासाठी प्रा. कोकाटे, प्रा. गोपाल जाधव आणि प्रा. प्रसन्न लोहे यांचे मार्गदर्शन मिळाले. विद्यार्थ्यांनी यासाठी संस्थेचे अध्यक्ष संजय अग्रवाल, सचिव अजय अग्रवाल, सदस्य जयेश अग्रवाल, डॉ. पी. बी. माहेश्वरी, प्रा. एस. एम. बंग, प्रा. एन. एच. पाटील, संचालक ए. पी. दोरसटवार, संचालक व डॉ. एस. आर. चौधरी, प्राचार्य, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. सोनेकर व विभागप्रमुखांचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com