गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून वाहनांची जाळपोळ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

एटापली तालुक्यात 40 नक्षल्यांचा पोलिसांनी ख़ात्मा केल्यानतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात कामावरच्या वाहनांची जाळपोळ केल्याने दुर्गम भागात पुन्हा भीतिचे वातावरण पसरले आहे.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात हालेवारा-गटेपल्ली मार्गावर रस्त्याचे काम सुरु असताना नक्षलवाद्यांकडून 10 जेसीबी, 3 ट्रॅॅक्टर,1 पिकअप वाहनाची जाळपोल करण्यात आली. 

हालेवारा-गटेपल्ली मार्गावर काम चालू होते. नक्षलवाद्यांनी रात्री कामाच्या ठिकाणी पोहचून जाळपोळ केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटने ठिकाणी अद्याप पोलिस पोहचलेले नाहीत.

एटापली तालुक्यात 40 नक्षल्यांचा पोलिसांनी ख़ात्मा केल्यानतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात कामावरच्या वाहनांची जाळपोळ केल्याने दुर्गम भागात पुन्हा भीतिचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Vehicle torched by the Naxalites in Gadchiroli

टॅग्स