व्यसनमुक्तीसाठी विक्रेत्याचा असाही प्रयत्न

व्यसनमुक्तीसाठी विक्रेत्याचा असाही प्रयत्न

मेंढला - युवकांना तंबाखू व अन्य व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी नरखेड तालुक्‍यातील खापा (घुटन) मधील सर्वांत मोठ्या किराणा दुकान संचालकाने अमलीपदार्थ न विकण्याचा निश्‍चय केला आहे. गावातील युवकात वाढलेली तंबाखूची सवय मोडण्यासाठी विक्रेत्याने घेतलेल्या पुढाकाराची प्रशंसा केली जात आहे. 

खापा (घुडन) येथील नरेश शंकर मानमोडे यांचे गावात सर्वांत मोठे किराणा दुकान आहे. दुकानातून ते सर्व प्रकारच्या साहित्याची विक्री करतात. दुकानातून सर्वाधिक विक्री तंबाखूजन्य पदार्थांची होते. लहान-मोठे सर्वच ग्राहक दुकानात तंबाखूच्या पदार्थांची मागणी करीत होते. दुकान सुरू करताना नस मंजन, तपकिरीपासून तर कधी जर्दा, तंबाखूपासून व्हायची. रात्री दुकान बंद करताना देखील ग्राहक तंबाखू खरेदी करण्यासाठी येत होते. अनेकजण पैसे नसल्याने उधारीवर खरेदी करीत होते. तर काही तंबाखू, खर्रा खाण्यासाठी एकमेकांची वाट पाहत होते. यात  अनेकांचा वेळ वाया जात होता. अनेक जण कामावर जाण्यासाठीदेखील टाळाटाळ करीत असल्याचे प्रकार घडू लागले होते. 

दुसरीकडे तंबाखूजन्य पदार्थाच्या वेस्टनावर असलेल्या ‘चेतावणी’कडे दुर्लक्ष करतात. विक्रेता म्हणून तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीमधून विक्रेत्याला फायदाच होतो. मात्र, गावातील युवकांना व्यसन लागू नये याची काळजी घेत मानमोडे यांनी तंबाखूजन्य पदार्थाची विक्री न करण्याचा  निर्णय घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com