व्यंकटेश सिटीला 50 हजारांचा दंड

file photo
file photo

नागपूर  : बुटीबोरी येथील व्यंकटेश असेट मल्टिप्लायर व व्यंकटेश असेट मॅक्‍झिमायसर या दोन कंपन्यांना भूखंड खरेदीत फसवणूक केल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने नुकसानभरपाईपोटी 50 हजार रुपये व तक्रारीच्या खर्चासाठी 5 हजार रुपये दंड ठोठावला.
या आदेशाची अंमलबजावणी संयुक्तपणे किंवा पृथकपणे आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांच्या आत करावी. या आदेशाची मुदतीत अंमलबजावणी न केल्यास दररोज 150 रुपये प्रत्यक्ष पैसे देण्यापर्यंत द्यावे लागणार असल्याचे मंचने आदेशात म्हटले आहे. हा निर्णय मंचचे अध्यक्ष शेखर मुळे, सदस्य अविनाश प्रभुणे आणि सदस्य स्मिता चांदेकर यांनी दिला.
महेंद्रसिंग राणा व तोताराम राणा (रा. सिमेंटनगर, चंद्रपूर) अशी तक्रारकर्त्यांची नावे असून, ते स्टेट ऑफ सल्तनत ऑफ ओमानमधील मस्कट येथील मल्टिनॅशनल कंपनीत कार्यरत आहेत. त्यांनी नागपुरात निवृत्तीनंतर राहण्याकरिता मालमत्ता घेण्याचे ठरविले होते. ते मस्कट येथे राहत असल्याने या कामाकरिता त्यांचे मित्र किशोर चिवंडे यांना आममुख्यातर पत्र दिले होते. व्यंकटेश हिल्स कान्होलीबारा येथील चार भूखंड 14 लाखांनी विकत घेण्याचा करार केला. यानंतर प्रतिवादींनी त्यांना सांगितले की, ऍलोविराची योजना राबवीत आहे. त्यांना आकर्षक आमिष देण्यात आले. चार भूखंड नोंदविल्यानंतर त्यांनी अकरा लाख रुपये त्यांना दिले होते. उर्वरित तीन लाख रुपये विक्रीपत्राच्या वेळेस देण्याचे ठरले होते. आम मुखत्यार पत्रधारकाने 24 महिन्यांनंतर लागवड व विकास शुल्काबाबत चौकशी केली. परंतु, प्रतिवादींनी त्यांना लागवडीचे शुल्क व विकास शुल्क घेण्यास नकार दिला. तसेच त्यांनी विक्रीपत्राची नोंदणी होऊ शकत नसल्याचे राणा यांना सांगितले. प्रतिवादींनी अदा केलेली रक्कम मंगरूळ येथील योजनेत गुंतविण्यास त्यांना सांगितले. तक्रारकर्त्याने प्रतिवादींच्या मंगरूळ, ता. समुद्रपूर, जि. वर्धा येथील दोन भूखंड घेण्याचे ठरविले. अकरा लाखांतून रक्कम वळती करण्यात आली. या दोन्ही भूखंडांचे विक्रीपत्र करून दिले नाही. 6 लाख 42 हजार 974 रुपये ही रक्कम परत केली नाही. तसेच ऍलोविरा रियल इस्टेट, कान्होलीबारा योजना व मंगरूळ येथील योजनेतील मिळणारा लाभही दिला नाही. त्यामुळे मंचात तक्रार दाखल केली. तक्रारकर्त्यातर्फे ऍड. मोहन सुदामे, ऍड. आर. डी. हजारे यांनी बाजू मांडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com