चोरटयांनी चोरली उभ्या ट्रकची चाके

मौदा ः याच ट्रकची चार चाके काढून चोरटे पसार झाले.
मौदा ः याच ट्रकची चार चाके काढून चोरटे पसार झाले.

मौदा   (जि.नागपूर) : अलीकडे नाही नाही ते चोरण्याच्या घटना घडत असताना चोरट्यांनी चक्‍क उभ्या ट्रकची चार चाके चोरण्याचा प्रताप केला आहे. मौदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील माथनी टोलनाक्‍याजवळ बुधवारी (ता. 16) रात्री दहाच्या सुमारास विश्रांतीकरिता थांबलेल्या ट्रकच्या मागचे दोन्ही बाजूंची चार चाके व ट्रकमधील 15 बोरी तुरीची डाळ चोरून नेली. 
सविस्तर वृत्त असे, नागपूरवरून तुरीची डाळ भरून ट्रक (क्र. सीजी 4 डी-9492) ओडिशा येथे जात होता. रात्री 10 वाजताच्या सुमारास चालक दिनेश गिरी यांनी जेवणाकरिता ट्रक माथनी टोलनाक्‍याजवळील अपेक्षा फॅमिली रेस्टॉरेंटसमोर थांबविला. चालक जेवण करून ट्रकच्या कॅबिनमध्ये विश्रांती करीत असताना चोरट्यांनी 14 चाके असलेल्या ट्रकची 4 चाके चोरून नेली. चोरून नेलेल्या चाकाच्या मागगेपुढे चाके असल्यामुळे त्यांना जॅकची आवश्‍यकता पडली नाही. मोठे दगड ठेवून ट्रकची चाके काढण्यात आली. तूरडाळीच्या 15 बॅग काढून चोरून नेल्या. चाके व तुरीच्या बोऱ्या चोरी गेल्याचे चालकाला सकाळी कळाले. ट्रक मालकाने मौदा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मौदा पोलिसांनी जागेचा पंचनामा करून चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास मौदा ठाणेदार मधुकर गीते यांच्या मार्गदर्शनात मनोहर जगवाड करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com